Breaking

MLAs protest : लुटारू, दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरतेय

Mahavikas Aghadi MLAs protest vigorously on the steps of Vidhan Bhavan : विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन

Mumbai : पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी विरोधी आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रकार सुरूच आहे. लुटारू, दरोडेखोरांची ‘चड्डी बनियान गँग’ महाराष्ट्रात फिरतेय असा आरोप करण्यात आला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी आमदारांनी दिलेल्या घोषणांनी सर्वांच्या लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. अधिवेशनात राज्यातील प्रश्न मांडण्यासोबत सत्ताधारी आणि विरोधी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकमेका विरोधात आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. शिवाय सरकारला घेरण्यासाठी सत्ताधारी पक्षांविरोधात महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्रित येत आपल्या मागण्यांकडे वेगवेगळ्या माध्यमातून लक्षवेधत आहेत.

Tribal Pardhi Society : पारधी समाजावर बहिष्कार टाकणाऱ्या पानगाव ग्रामपंचायतीवर अॅट्रॉसीटीची कारवाई !

महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हैदोस घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन केले जात असल्याने या गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले असे, राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आंदोलना संदर्भात बोलताना म्हणाले.

Pravi Datke : अल्पसंख्याक शाळांमध्ये नाहीत मराठीचे शिक्षक !

‘ पन्नास खोके एकदम ओके’. ‘ चड्डी बनियन गँग’ हाय हाय..
‘ महाराष्ट्राला लुटणाऱ्या धिक्कार असो…’दरोडेखोर चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो’, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अधिवेशन सुरू झाल्या पासून विरोधी पक्षाच्या वतीने या प्रकारचे आंदोलन करून सत्ताधारी पक्ष आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित मंत्री अथवा विरोधी पक्षाचे इतर आमदार समोर आल्यानंतर आंदोलकांचा आवाज वाढण्याचे समोर येते.