Breaking

MLC Abhijit Wanjari : अपंग विभागच रिक्त पदांच्या बाबतीत ‘अपंग’!

Demand to resolve the issue of vacant posts in the department for disabled : ना रिक्त पदे भरली, ना पदोन्नती झाल्या; आमदारांनी मांडला प्रश्न

Nagpur सामाजिक न्याय विभागांतर्गत येणारा अपंग विभागच रिक्त पदांच्या बाबतीत पूर्णपणे ‘अपंग’ झाला आहे. या विभागातील पदोन्नतीचा प्रश्नही गेल्या अनेक दिवसांपासून मार्गी लागलेला नाही. विधानपरिषदेत आमदार अभिजित वंजारी यांनी या मुद्दा उपस्थित केला. स्वतंत्र विभाग तयार करूनही आजपर्यंत त्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे भरली गेलेली नाहीत. हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी त्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

अपंग विभाग स्वतंत्र केल्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण त्या विभागाचे कार्य प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची पदभरती तातडीने व्हायला हवी होती. सध्या या विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष बाब म्हणून जी पदे भरणार आहेत, त्यात समांतर आरक्षण अंमलात आणणार आहात का, असा प्रश्न वंजारी यांनी उपस्थित केला.

Hindi controversy : हिंदी सक्तीवर उतारा, मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर!

याचबरोबर आमदार वंजारी यांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया रखडल्याबाबतही मुद्दा उपस्थित केला. राज्य शासनाच्या विविध खात्यांतील अनेक कर्मचाऱ्यांची पदोन्नती अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Vikas Thakare : काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा विकास ठाकरेंवर आरोप

एकीकडे सरकारने पदभरतीबाबत सकारात्मक भूमिका दाखविली असताना वंजारी यांच्या मागणीला प्रशासन गंभीरतेने घेणार का हा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.