Breaking

MoS Prataprao Jadhav : पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!

Directed to get farmers benefited of PM Kusum Yojna : केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचे आदेश

Buldhana प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (पीएम कुसुम योजना) अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. तसेच त्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले.

बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी भूषवले. यावेळी केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायदे, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Youth Congress Controversy : पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी पोहोचली दिल्लीत!

बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना निर्देशित केले. पीएम कुसुम योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

बुलढाणा येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंबंधी आढावा घेण्यात आला. शाळांसाठी सीबीएसई पद्धत: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत असल्याने शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करून सीबीएसई पॅटर्न अंगीकारण्याची सूचना केली. जिल्ह्यातील पाणंद रस्ते येत्या मार्चपर्यंत मोकळे करण्याचे निर्देश.

Guillain Barre Syndrome : जिल्ह्यात GBS चे ४ संशयित रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर

शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची शिल्लक रक्कम लवकरात लवकर जमा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश. आरोग्य विभागातील रिक्त पदे तत्काळ भरण्याचे निर्देश तसेच भालगाव आणि पळशी बुद्रुक येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा ठराव मंजूर. या बैठकीत मंजूर करण्यात आलेले ठराव आणि घेतलेले निर्णय जिल्ह्यातील विकास प्रक्रियेस गती देण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.