MSRTC : विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी, एसटी प्रशासन झुकले

Students’ protest against ST admninistration successful : दोन तास ताटकळायचे विद्यार्थी, बसचे वेळापत्रक बदलण्याची तयारी

Malkapur शाळा सायंकाळी ४ वाजता सुटत असताना विद्यार्थ्यांसाठी बस थेट ६ वाजता लावली जात होती. दोन तासांहून अधिक काळ ताटकळण्याच्या या अन्यायकारक परिस्थितीविरोधात मोताळा तालुक्यातील माकोडी व टेंभी येथील ४३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मलकापूर आगार व्यवस्थापक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्येची दखल घेऊन आगार व्यवस्थापक मुकुंद नाव्हकर व वाहतूक नियंत्रक सत्यजित सावकाश यांच्याकडून बस वेळेवर म्हणजेच सायंकाळी साडेचार वाजता लावण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Vidarbha Farmers : कर्जमाफी नाही; तरीही ७० टक्के शेतकऱ्यांनी केली परतफेड

या आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी, “उद्यापासून बस वेळेवर लागली नाही, तर विद्यार्थ्यांना भत्ता उपलब्ध करा आंदोलन पेटवू,” असा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांची अडचण सोडवण्याचे मान्य केले.

Local Body Elections : माजी नगरसेवक, इच्छुकांचे राजकीय गणित बिघडणार

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी यांच्यासह झेड. ऐ. उर्दू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व नूतन विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.