Breaking

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : या प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता ११ महिने!

The duration of the scheme has now been 11 months : १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना लाभ; पाच महिन्यांनी कालावधी वाढला

Amravati युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी आता ११ महिने करण्यात आला आहे.

यापूर्वी उमेदवारांची सहा महिन्यांसाठी निवड केली जात होती, मात्र आता त्यांना अधिक ५ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी कार्यप्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. तथापि, नवीन निर्णयामुळे त्यांना मुदतवाढ मिळाली आहे.

Farmer suicide case : युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने संतापाचा उद्रेक

यामुळे सहा महिने कार्यप्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना उर्वरित ५ महिन्यांसाठी मूळ आस्थापनेवर त्वरीत रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित आस्थापनांनीही या उमेदवारांना तत्काळ रुजू करून घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. ही योजना युवकांना प्रत्यक्ष कार्यानुभव देऊन त्यांचे कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, त्यामुळे त्यांना भविष्यात रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही शासनाने सुरू केलेली उपक्रमशील योजना आहे, जी शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव मिळावा आणि त्यांची रोजगारक्षमता वाढावी यासाठी राबविली जाते. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना विविध शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ११ महिन्यांचे कार्यप्रशिक्षण मिळते, ज्यामुळे त्यांना भविष्यात रोजगार मिळवण्यासाठी मदत होते.

Farmer Suicide : पश्चिम विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या!

१८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेले युवक. प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायचा आहे आणि रोजगाराच्या संधी वाढवायच्या आहेत असे युवक. तसेच विविध शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार यांना याचा लाभ मिळेल.