A strong wave of support for BJP in Mul — citizens confident of development under the leadership of MLA Sudhir Mungantiwar! : तालुक्याचा बदलला चेहरा; विकास हवा असेल तर भाजपच – लोकांमध्ये प्रचंड चर्चा
Mul – Chandrapur : मुल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात भाजपचा झेंडा फडकण्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या विकासाभिमुख नेत्याचे नेतृत्व लाभले असल्याने मुल शहराचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये दृढ होत आहे.
मुल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या काही वर्षांत आमदार मुनगंटीवार यांनी केलेल्या कामांची यादी मोठी असून, तीच भाजपच्या बाजूने सर्वात मोठी ताकद ठरत आहे. मुलचा खरा विकास करायचा असेल तर भाजपला पर्याय नाही, ही एकच चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. आमदार मुनगंटीवार यांनी आजवर इतकी विकास कामे केलेली आहेत की, यादी वाचताना माणूस अक्षरशः थकून जातो. पण कामे करताना आमदार मुनगंटीवार कधी थकत नाहीत.
Local Body Elections : १५ नगरपरिषद व १२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस !
मुख्य रस्ता आणि शहरातील मूलभूत पायाभूत सुविधांचा विस्तार, कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृहाची उभारणी, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीची नवी इमारत, शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा विस्तार, आधुनिक स्टेडियम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क आणि स्विमिंग टॅंकची सुविधा, आठवडी बाजाराचे आधुनिकीकरण ही पूर्ण केलेली कामे येथे ठळकपणे सांगता येतील.
याशिवाय, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही आमदार मुनगंटीवार यांनी भरीव कामगिरी केली आहे. १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेली मान्यता, सुरू असलेली कामे आणि अनेक नवीन आरोग्य सुविधा यामुळे मुल तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रातही महत्वाची भर घालत सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय, मुल पॉलिटेक्निक कॉलेजला मिळालेली मान्यता आणि मुलीसाठी सुरू झालेले शूरवी महाविद्यालय, या सर्व प्रकल्पांत आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून ठोस परिणाम साधला.
नागरिकांचे म्हणणे आहे की, तालुक्याचा चेहरामोहरा जसा बदलला, तसाच पुढील काळातही बदल घडवायचा असेल, तर भाजपचीच सत्ता आवश्यक आहे. बल्लारपूर विधानसभेतील मुल हा निश्चीत विजयी गड ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्येही वाढत आहे. एकूणच, निवडणूक जवळ येत असताना मुल शहरात भाजपच्या समर्थनाची प्रचंड हवा असून, विकासाच्या आधारावर मतदारांचा कल कमळाकडे झुकलेला दिसत आहे.
Local body election : स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मोठे पक्षांतर; भाजपची रणनीती चर्चेत !
मुल नगर परिषद हद्दीत पू्र्ण झालेली कामे..
नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत दोन ओपन स्पेस मध्ये जॉनलिंग फिनिशिंगचे बांधकाम ४० लाख ९४ हजार रुपये, सिद्धमशेट्टीवार लेआउटमधील अभ्यासिका येथे आंतरिक सजावट व परिसर विकसित करणे २१ लाख २८ हजार दुर्गा मंदिर डीपी रोड ते मारगोनवार यांच्या घरापर्यंत भूमिगत पथदिवे बसवणे १६ लाख ८७ हजार.
नागरी दलित वस्ती निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक आठ मध्ये सीसी रोड नाली बांधकाम ८८ लाख २३ हजार, प्रभाग क्रमांक ९ मध्ये सीसी रोड पाईपलाईन ट्रेन व आरसीसी कव्हर बांधकाम ११ लाख ६२ हजार, प्रभाग क्रमांक ९ मध्ये पुप्पलवार यांच्या घरापासून ते हायवे रोडपर्यंत नालीवर आरसीसी कव्हरचे बांधकाम ९ लाख ६२ हजार, प्रभाग क्रमांक दहा मध्ये मेश्राम यांच्या घरापासून ते मधुकर घडसे यांच्या घरापर्यंत सीसी रोड व आदी बांधकाम २७ लाख ५५ हजार, प्रभाग क्रमांक दहामध्ये बाबाजी मेश्राम यांच्या घरापासून ते मधुकर गडचे यांच्या घरापर्यंत सीसी रोड सीसी कव्हर व पेविंगचे बांधकाम २७ लाख ५५ हजार.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर निधी अंतर्गत पूर्ण झालेली कामे..
स्विमिंग पूल येथे टेक्स्टाईल्स चे बांधकाम करणे ९६ लाख, मॉडेल हायस्कूल नगर परिषद मुल येथे डेस्क व बॅचेस खरेदी करण्याचे काम २५ लाख सात हजार, मॉडेल हायस्कूल नगर परिषदमध्ये मुलीचे डेस्क व बॅचेस खरेदी करणे २५ लाख सात हजार, वार्ड नंबर आठमध्ये 29 लाख 96 हजाराची कामे, चामोर्शी फाटा ते स्मशानभूमी येथे स्ट्रीटलाईट पोल लावणे आणि नगर परिषद मुलअंतर्गत वार्ड क्रमांक १६ मधील सुमित मेश्राम ते सुभाष शेंडे व वार्ड क्रमांक १७ मधील दादाजी गाजेवार ते शालिबाई खोब्रागडे यांच्या घरापर्यंत वाढीव विद्युत पोल ५६ लाख १९ हजार, प्रभाग क्रमांक चार वार्ड नंबर आठमध्ये ३० लाख ६४ हजार, प्रभाग क्रमांक पाच मध्ये पठाण ते रामभाऊ गाजरावर यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम वार्ड क्रमांक दोन मध्ये गोठुल जवळील झुकाचे सौंदर्यकरण करणे २३ लाख.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत झालेली कामे..चामोर्शी जवळ १२.५ मीटर उंच उंच खांब उभारणे आणि कर्मवीर महाविद्यालयाजवळ नाका चौक आणि रेल्वे फाटक उभारणे काम मंजूर, आशिष खोब्रागडे यांच्या घरापासून ते स्वामी विवेकानंद शाळेजवळ बालाजी गुरनुले यांचे घरापर्यंत अतिरिक्त पोल पुरविणे ६४ लाख २० हजार, स्वामी विवेकानंद शाळेपासून विलास सोनुले यांचे घरापर्यंत नगरपरिषदेअंतर्गत खुल्या जागेवर अतिरिक्त पोल प्रदान करणे 72 लाख, LED स्ट्रीट लाइट फिटिंग ४५ W आणि ९० W प्रदान करणे ९९ लाख ९९ हजार, श्रमिक नगर प्रभाग क्र. ८ मध्ये LT AB केबल लाईन उभारणे आणि चालू करणे ४१ लाख ९१ हजार, चामोर्शी नाका येथे एलईडी फ्लड हायमास्ट पोल प्रदान करणे १९ लाख ५१ हजार.
Cabinet meeting : मुंबईत परवडणाऱ्या घरांना चालना, ‘ ‘आयकॉनिक’ शहरासाठी नवे धोरण!
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पूर्ण झालेली कामे..प्रभाग क्रमांक आठमध्ये बालमवार यांच्या घरापासून ते नागोसे यांच्या घरापर्यंत जुनी ओव्हरहेड एलटी लाईन काढून त्या जागी नवीन भूमिगत एलटी लाईन टाकणे 31 लाख 52 हजार, प्रभाग क्रमांक आठमध्ये फिरोजगार यांच्या घरापासून ते गजानन चितळे यांच्या घरापर्यंत जुनी ओव्हरहेड एलटी लाईन काढून त्या जागी नवीन एलटी लाईन टाकणे १५ लाख, प्रभाग क्रमांक दहामध्ये बालाजी मेश्राम यांच्या घरापासून ते कविता गोवर्धन ते मधुकर धाडसे यांच्या घरापर्यंत जुनी ओव्हरहेड एलटी लाईन काढून त्या जागी नवीन भूमिगत एलटी लाईन टाकणे ४६ लाख, प्रभाग क्रमांक १०मध्ये राजू मेश्राम यांच्या घरापासून ते कस्तुरी यांच्या घरापर्यंत जुनी ओव्हरलेट एलटी लाईन काढून त्याजागी नवीन भूमिगत एलटी लाईन टाकणे 21 लाख 19 हजार.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या असंख्य विकासकामांमुळे जनतेत ठाम विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे मुल नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचा भक्कम विजय निश्चित आहे, असा विश्वास नागरिक ठामपणे व्यक्त करत आहेत.








