Rain of nominations for 15 municipal councils and 12 municipal panchayats : अनेक ठिकाणी दहापट अर्ज दाखल, नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांना वेग
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जोरदार सुरुवात झाली आहे. १५ नगरपरिषद आणि १२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी १० पेक्षा जास्त तर नगरसेवक पदांसाठी शंभराच्या पुढे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या निवडणुकांमध्ये काट्याची टक्कर आणि बहुमतासाठी चुरस दिसणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
नगरपरिषद निवडणुका : अर्जांची नावनोंदणी दमदार..
डीगडोह नगरपरिषद – नगराध्यक्ष पदासाठी सात, तर नगरसेवकांसाठी तब्बल १०८ अर्ज दाखल. वानाडोंगरी नगरपरिषद – नगराध्यक्षांसाठी १० आणि नगरसेवकांसाठी १३६ उमेदवार मैदानात. बुटीबोरी नगरपरिषद – नगराध्यक्ष पदासाठी १३ आणि नगरसेवकांसाठी ६६ अर्ज. कळमेश्वर–ब्राह्मणी नगरपरिषद – नगराध्यक्ष सहा आणि नगरसेवक ८५ अर्ज. खापा नगरपरिषद – नगराध्यक्ष सहा, तर नगरसेवकांसाठी ६१ अर्ज दाखल. उमरेड नगरपरिषद – नगराध्यक्ष पदासाठी पाच आणि नगरसेवकांसाठी तब्बल १२२ उमेदवार.
Local body election : स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मोठे पक्षांतर; भाजपची रणनीती चर्चेत !
रामटेक नगरपरिषद – नगराध्यक्ष सहा आणि नगरसेवकांसाठी ९९ अर्ज. मोहपा नगरपरिषद – नगराध्यक्ष पाच, नगरसेवक ६३ अर्ज. काटोल नगरपरिषद – नगराध्यक्ष तीन आणि नगरसेवकांसाठी ९२ अर्ज. मोवाड नगरपरिषद – नगराध्यक्ष पदासाठी चार आणि नगरसेवक ५२ अर्ज. सावनेर नगरपरिषद – नगराध्यक्ष सहा आणि नगरसेवकांसाठी तब्बल १३० अर्ज. नरखेड नगरपरिषद – नगराध्यक्ष सहा आणि नगरसेवक १२१ अर्ज. वाडी नगर परिषद – नगराध्यक्ष पदासाठी १२ आणि नगरसेवकांसाठी १६२ अर्ज, सर्वाधिक स्पर्धा. कामठी नगरपरिषद – नगराध्यक्ष पदासाठी १०, नगरसेवक आकडे उपलब्ध झाले नाहीत.
Cabinet meeting : मुंबईत परवडणाऱ्या घरांना चालना, ‘ ‘आयकॉनिक’ शहरासाठी नवे धोरण!
१२ नगरपंचायतीतही जोरदार प्रतिसाद..
येरखडा – नगराध्यक्ष पदासाठी १२ आणि नगरसेवकांसाठी ७८ अर्ज. नीलडोह – नगराध्यक्ष चार, नगरसेवक ६८ अर्ज. गोधनी रेल्वे – नगराध्यक्ष सहा आणि नगरसेवक ५६ अर्ज. कांद्री–कन्हान – नगरसेवक आकडे उपलब्ध नाहीत. बेसा–पिंपळा – नगराध्यक्ष आठ आणि नगरसेवक ७९ उमेदवार. बहादूरा – नगराध्यक्ष सहा आणि नगरसेवकांसाठी १०६ अर्ज. बीडगाव–तरोडी – नगराध्यक्ष पाच आणि नगरसेवक ७२ अर्ज.
भिवापूर – नगराध्यक्ष नऊ आणि नगरसेवक ८९ अर्ज. कोंढाळी – नगराध्यक्ष पाच आणि नगरसेवक ८० अर्ज. पारशिवनी – नगराध्यक्ष चार आणि नगरसेवक ८५ अर्ज. महादूला – नगराध्यक्ष चार आणि नगरसेवकांसाठी तब्बल ११४ अर्ज. मौदा – नगराध्यक्ष तीन आणि नगरसेवक ७५ अर्ज.
Local Body Elections : “गुन्हेगार पकडायचे की भाजपला उमेदवार द्यायचे?” पोलिसांनाही पडला प्रश्न !
निवडणूक हंगाम तापणार..
उमेदवारी अर्जांच्या संख्येवरूनच यावेळची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार, हे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी प्रभागांचे गणित, स्थानिक पातळीवरील नाराजी, गट–तटबंदी आणि पक्षांतर यांचा मोठा परिणाम उमेदवारीवर दिसून येत आहे. आता छाननी, अर्ज माघारी आणि अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर खरी निवडणूक रंगतदार होणार आहे.








