Big changes in the political equation : अनेकांचे गणित बिघडले, राजकीय समीकरणात मोठे बदल
Mumbai : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी वॉर्ड आरक्षण सोडत अखेर जाहीर करण्यात आली असून या निर्णयामुळे मुंबईच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूण २२७ प्रभागांसाठी जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीत अनेक विद्यमान व माजी नगरसेवकांचे राजकीय गणितच बदलले आहे. सर्वात मोठा फटका ठाकरे गटाला बसल्याचे स्पष्ट दिसत असून तेजस्विनी घोसाळकर आणि मिलिंद वैद्य यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघांवर आरक्षणामुळे थेट परिणाम झाला आहे.
या आरक्षण सोडतीनुसार ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्विनी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक १ मागासवर्ग प्रवर्ग (OBC) म्हणून आरक्षित झाला आहे. तेजस्विनी घोसाळकर गेल्या काही दिवसांपासून या वॉर्डात निवडणुकीची जोरदार तयारी करत होत्या, मात्र आरक्षण बदलल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य यांचा वॉर्ड क्रमांक १८२ जो यापूर्वी सर्वसाधारण गटात होता, तो आता मागासवर्ग प्रवर्ग (OBC) म्हणून आरक्षित झाल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
Delhi blast case : ‘षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार…’
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे सर्व पक्षांच्या रणनीतीत बदल होणार आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यासाठी ही आरक्षण सोडत निर्णायक ठरणार आहे. अनेक वॉर्डांचे आरक्षण बदलल्यामुळे नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे, तर काही विद्यमान नगरसेवकांना आपले प्रभाग बदलावे लागतील.
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनुसार एकूण २२७ प्रभागांपैकी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) साठी ६१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३० जागा ओबीसी सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी आहेत. अनुसूचित जातींसाठी १५ आणि अनुसूचित जमातींसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये SC महिलांसाठी व सर्वसाधारण गटांसाठी विशिष्ट प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
या नव्या आरक्षण योजनेमुळे अनेक राजकीय कार्यकर्त्यांना आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे. काही नेत्यांना आरक्षणामुळे राजकीय नुकसान होणार असले तरी काही नवोदितांना संधी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ही आरक्षण सोडत कायदेशीर निकषांनुसार आणि लोकसंख्या आकडेवारीनुसार करण्यात आली असून येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Dhantoli Building Scam : नझुल आणि मनपा अधिकाऱ्यांचे बिल्डरशी संगनमत उघड !
मुंबईतील ही आरक्षण सोडत केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही महत्वाची ठरली आहे. कारण मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांसाठी राखीव प्रभागांची संख्या या वेळेस तुलनेने वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला नव्या पिढीतील प्रतिनिधींसाठी जागा उपलब्ध होण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्यांनी या बदलांवर नाराजी व्यक्त केली असून लवकरच पक्षस्तरावर रणनीती आखली जाणार असल्याचे संकेत आहेत.
_____








