Congress–Vanchit Bahujan Aghadi may fight polls together : पडद्यामागे जोरदार हालचाली, महायुतीपुढे आव्हान
Akola महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई वगळता राज्यातील उर्वरित २८ महापालिकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य आघाडीमुळे महायुतीसमोर महापालिका निवडणुकांत नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
Municipal Corporation Elections : माजी मंत्र्यांच्या पुतण्याच्या नेतृत्वात भाजपचे बंडखोर एकत्र
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याबाबत सविस्तर चर्चा केली असून, सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती आहे. येत्या काळात दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या दिशेने पावले टाकत असल्याने राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. बैठका, उमेदवार अर्जांचे वाटप, इच्छुकांच्या मुलाखती अशा घडामोडी सुरू आहेत. युती व आघाड्यांबाबतही नेतेमंडळींमध्ये चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
Local Body Elections : १७ हजार मतदारांच्या हाती चार नगरसेवकांचा कौल; खामगावमध्ये पोटनिवडणुकीची रंगत
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र यावे, यासाठी अनेक नेत्यांकडून पडद्यामागे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. मुंबईत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता असली, तरी उर्वरित महापालिकांमध्ये आघाडी निश्चित मानली जात आहे. यासंदर्भात जागावाटपावरील पहिल्या टप्प्यातील बैठक पार पडली असून, आगामी काळात याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.








