Ajit Pawar’s NCP ready for Nagpur Municipal Corporation elections : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने उचलले महत्त्वाचे पाऊल
Nagpur : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने सज्जता दाखवत महत्वपूर्ण संघटनात्मक पाऊल उचलले आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार या निवडणुकीसाठी पक्षाने विशेष समिती गठित केलेली आहे.
समितीच्या स्थापनेमुळे नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी समितीतील सर्व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी निवडणूक रणनीतीसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ही समिती निर्णय भूमिका बजावेल, असे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी म्हटले. जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने ही समिती स्थापन होऊ शकली, असेही ते म्हणाले.
Amravati Police : गृहराज्यमंत्री, क्रीडा राज्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताला दांडी!
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही समिती संघटन बांधणी, उमेदवार निवड, प्रचार आराखडा आणि मतदारांपर्यंत पोहोचणे या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहरातील प्रभागनिहाय संयोजक आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे काम या समितीकडून केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नागपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या नेतृत्वात पक्षाचे शहरातील जनाधार वाढवण्याचा आणि नागरिकांच्या समस्यांवर ठोस पर्याय म्हणून उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
Bacchu Kadu Pravin Tayde : लाखाचे बक्षीस आणि कडू-तायडे आमनेसामने!
या समितीची स्थापना ही नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावी पुनरागमनाची दिशा ठरू शकते. गेल्या काही वर्षात स्थानिक स्तरावर पक्षाने पुन्हा उभारी घेतल्याने ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. संघटन रणनीती आणि समन्वय या तीन गोष्टींवर भर देत आम्ही नागपूरकरांच्या विश्वासाचे आणि स्वप्नातले शहर निर्माण करू, असे श्रीकांत शिवणकर यांनी स्पष्ट केले.








