Municipal Corporation Election : अनेकांना बसला सोडतीचा फटका, दिग्गज नेते हादरले !

Many were affected by the lottery, veteran leaders are shocked : प्रभाग आरक्षणात मोठी उलथापालथ, अनेक माजी नगरसेवकांसाठी रणभूमी अवघड

Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काल 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीनंतर नागपूर शहराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. अनेक दिग्गज नगरसेवकांना या सोडतीचा फटका बसलेला दिसतो आहे. काही माजी नगरसेवकांच्या गणितांवर या सोडतीने पाणी फिरवलं आहे. नागपूर महानगरपालिकेत प्रभाव गाजवणाऱ्या माजी नगरसेवकांना आता पुन्हा निवडून येण्यासाठी एकमेकांसमोर उभं टाकावं लागणार आहे.

या सोडतीमुळे अनेक प्रभागांमध्ये एकाच पक्षातील तीन तीन प्रभावी दावेदारांसाठी फक्त एकच जागा शिल्लक राहिलेली आहे. परिणामी तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष तीव्र होणार, हे निश्चित. काही ठिकाणी आरक्षण बदलल्यामुळे जुन्या उमेदवारांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काही प्रभागांत महिला आरक्षण लागू झाल्याने ज्येष्ठ नगरसेवकांना पत्नी किंवा इतर नातेवाईकांना उमेदवारी देण्याबाबत विचार करावा लागणार आहे. त्यामुळे घराघरांत राजकारण पेटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.

Local Body Elections : नागपूर जिल्हा काँग्रेसच्या ‘त्या’ बैठकीवरून गोंधळात गोंधळ !

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे प्रभाग आरक्षणाचे प्रारूप १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना २४ नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना सादर करता येतील. त्यानंतर २ डिसेंबरला अंतिम आरक्षणाची सोडत प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर तिकीट वाटपाच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.

Ajit Pawar : ‘माझा संबंध नाही’ म्हणाले पण सिंचन ते जमीन…

तिकीट वाटपासाठी होणार झुंज..
सध्याच्या आरक्षणाच्या फेरीनंतर पक्षांतील तिकीट वाटप हा सर्वात मोठा संघर्षाचा टप्पा ठरणार आहे. अनेक ठिकाणी जुने कार्यकर्ते आणि महिला नेत्यांमध्ये स्पर्धा वाढणार आहे. या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, ती म्हणजे यावेळीची निवडणूक फक्त जनतेमधील लोकप्रियतेचीच नव्हे, तर पक्षातील अंतर्गत बळकटीची खरी कसोटी ठरणार आहे.