BJP aspirants’ interviews scheduled for December 15 : अकोल्यात पार पडणार प्रक्रिया, उमेदवारीसाठी मोठा प्रतिसाद
Akola आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडे नगरसेवकपदासाठी सर्वाधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवार, १५ डिसेंबर रोजी आळशी संकुलातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात घेण्यात येणार आहेत.
या मुलाखती सकाळी १० पासून सुरू होतील. उमेदवारांची अंतिम निवड भाजप प्रदेश निवड समिती करणार असून, अकोला जिल्हा संचलन समितीने केलेल्या शिफारशी तसेच पक्षाच्या सर्व्हे अहवालाच्या आधारे उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.
Amravati Municipal Corporation : महापालिका हद्दीतील विविध विकासकामांसाठी ५०० कोटींचा निधी मंजूर
भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महानगर अध्यक्ष जयंत मसने, निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल, वैशाली शेळके, पवन महल्ले, संघटन सरचिटणीस माधव मानकर, संजय गोटफोडे, रमेश अलकरी, आम्रपाली उपरवट, ॲड. देवाशिष काकड आदींच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
मुलाखतीनंतर प्रत्येक प्रभागातून तीन उमेदवारांचे पॅनल तयार करून ते प्रदेश भाजपाकडे पाठविण्यात येणार आहे.
भारतीय जनता पक्षाकडे अल्पसंख्याक प्रवर्गातून ३५, ओबीसी प्रवर्गातून २२७, खुल्या प्रवर्गातून ३३२ तर तब्बल ३०० महिलांनी उमेदवारीची मागणी केली आहे. या सर्व इच्छुकांचे मत व पक्षासाठीची भूमिका मुलाखतीद्वारे जाणून घेतली जाणार आहे.
Local Body Elections : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सचिवाची प्रतिष्ठा पणाला
प्रभाग क्रमांक १ ते २० पर्यंतच्या उमेदवारांच्या मुलाखती या टप्प्यात घेण्यात येणार असून, महायुतीबाबत प्रदेश भाजपाच्या निर्णयानुसार पुढील निवडणूक रणनीती ठरविण्यात येईल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.








