Municipal Corporation Elections : महाविकास आघाडीत ‘मनसे’वरून कोंडी; काँग्रेसचा विरोध, तर पवारांची तयारी !

 

Mahavikas Aghadi in dilemma over ‘MNS’; Congress opposes, while Sharad Pawar is ready : मुंबई महापालिका निवडणुकीत युतीबाबत अनिश्चिततेचं सावट गडद; भाजपच्या सर्व्हेमुळे विरोधकांमध्ये धडकी

Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचं की नाही, या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास ठाम विरोध दर्शवला असताना शरद पवार मात्र मनसेला आघाडीत सामावून घेण्यास तयार असल्याचं स्रोतांकडून समजतं. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमधील तणाव उफाळून येत असून या वादामुळे संपूर्ण महाविकास आघाडीतील गोंधळ अधिकच वाढला आहे.

मतचोरीच्या आरोपांवरून सर्वपक्षीय मोर्चा काढला जात असतानाच निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढवल्या जात आहेत, यावरून शरद पवारांनी थेट सवाल केला. मतचोरीविरुद्ध एकत्र येता, मग निवडणूक आली की वेगळे का, असा त्यांचा रोख काँग्रेस-ठाकरे सेनेकडे आहे. यावर प्रत्युत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पवारांसह उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करत, मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. अंतिम निर्णय राज ठाकरे घेतात, अशा स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.

Illicit domestic and foreign liquor : नागपुरात बनावट दारू कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड !

 

दुसरीकडे काँग्रेस नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सर्वांनी धीर धरावा, असं सांगत हा वाद निर्माण होऊ नये, अशी भूमिका घेतली. मतचोरीचा मुद्दा केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही, तो सर्वपक्षीय असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. या मोर्चाचं निमंत्रण भाजपलाही दिलं होतं, असं म्हणत त्यांनी आरोपांची गंभीरता वाढवली. दरम्यान, ठाकरे सेनेनेही स्पष्ट केलं आहे की, काँग्रेस आणि ठाकरे सेना जर परस्परांत भिडली तर दोघांनाही नुकसान होणार. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडशी सतत संपर्कात असल्याचं समजतं.

Sudhir Mungantiwar : उशिराने उमजले वास्तव , चंद्रपूरचे खासदार म्हणून मुनगंटीवारांचीच गरज होती!

दुसरीकडे, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमुळे विरोधकांचे टेन्शन वाढलं आहे. सर्व्हेनुसार मुंबईत भाजप ८२ जागा राखेल, तर महायुती एकत्र लढल्यास १०० पेक्षा जास्त जागा महायुतीच्या खात्यात जाऊ शकतात. काँग्रेसच्या ३१ माजी नगरसेवकांच्या जागांपैकी ८ जागांवर भाजप सहज विजय मिळवेल, असा अंदाज सर्व्हेत आहे. शिवसेना (ठाकरे गट)कडे सध्या फक्त ३८ माजी नगरसेवक उरले असून बाकीच्यांनी घर सोडलं आहे. एकूणच, मनसेच्या महाविकास आघाडीत प्रवेशाभोवतीचं समीकरण महाविकास आघाडीत फूट आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण करत आहे. पुढील काही दिवसांत युतीचं चित्र अधिक स्पष्ट होईल, पण सध्या तरी विरोधकांमधील गोंधळ आणि भाजपच्या सर्व्हेचा दबदबा राजकीय समीकरणं ढवळून काढत आहे.