Municipal Corporation Elections : राजकीय हालचाली वाढल्या; युती-आघाड्यांची जुळवाजुळव सुरू

Alliance and front negotiations begin : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखतींचे सत्र

Akola महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांकडून बैठका, गाठभेटी आणि उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू झाले आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसने गुरुवारी १२५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी इच्छुक उमेदवारांची प्राथमिक यादी निर्णयासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी युती करून महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिवसेना (ठाकरे गट) ने मनसेला आठ जागांचा प्रस्ताव दिला असून, तो गुरुवारी झालेल्या बैठकीत मनसेने मान्य केला आहे. या युतीबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती उभय पक्षांच्या जिल्हाप्रमुखांनी दिली. जागावाटप आणि उमेदवारीसंदर्भातील उर्वरित मुद्दे परस्पर चर्चेतून सोडवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

.Fadnavis on Shinde: सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची ठाम पाठराखण

महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती, तसेच शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी—या दोन्ही आघाड्यांबाबत अद्याप स्पष्ट चित्र समोर आलेले नाही.
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असल्याच्या केवळ वावड्या प्रसारमाध्यमांतून पसरल्या असून, त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती जवळपास निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना १२ ते १४ जागा देण्यात येण्याची शक्यता आहे. या गटाने इच्छुक उमेदवारांची यादी भाजपच्या जिल्हास्तरीय पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याची माहिती आहे.