MLA Praveen Datke Brings New Hope to the Lives of Sanitation Workers : ४४०७ कर्मचाऱ्यांना लागू होणार पागे समितीच्या शिफारसी
Nagpur : ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य पदे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर किंवा कार्यरत असताना झालेल्या मृत्यूनंतर व्यपगत होत असतात. त्यामुळे कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यासाठी पद निर्माण करता येत नाही. ही अट रद्द करण्यासाठी आमदार प्रवीण दटके यांनी आमदार म्हणून निवडून येताच पुढाकार घेतला. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या अधिवेशनांमध्ये त्यांनी हा मुद्दा सभागृहात लाऊन धरला.
आमदार दटके यांच्या लढ्याला अखेर यश आले अन् नागपूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधातील ४४०७ अधिसंख्य सफाई कर्मचाऱ्यांना आता लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होणार आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबत शासन निर्णय काल (९ ऑक्टोबर) प्रसिद्ध केला आहे. आमदार दटके यांनी डिसेंबर २०२४ आणि अर्थसंकल्पीय आधिवेशन २०२५ मध्ये लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून ही मागणी लाऊन धरली होती. त्यानंतरही त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला, रेल्वे उड्डाण पुलासाठी ३१ कोटी मंजूर !
राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या या निर्णयामुळे ४४०७ कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची ८५६० पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. महानगरपालिकेतील अधिसंख्य पदांवर सामावून घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाच्या हक्काचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आमदार दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने यासाठी पाठपुरावा केला होता.
Dirty politics : माझी भीती वाटते म्हणून माझ्या आईचा फोटो वापरून…
शासनाच्या या निर्णयाने सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे. मृत अथवा सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना हक्काचा लाभ देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तातडीने अर्ज करावे, असे आवाहन प्रवीण दटके यांनी केले आहे. या निर्णयामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनात नवीन चैतन्य निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.








