व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला, रेल्वे उड्डाण पुलासाठी ३१ कोटी...

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिलेला शब्द पाळला, रेल्वे उड्डाण पुलासाठी ३१ कोटी मंजूर !

Sudhir Munghantiwar Marks a Major Milestone in Mul’s Development : मुलच्या विकासात गाठला महत्वाचा टप्पा

Chandrapur : विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुलवासीयांना रेल्वे क्रॉसींगवर उड्डाणपूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासने फक्त द्यायची नसतात, तर सातत्याने पाठपुरावा करून ती पूर्ण करायची असतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मुल येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी त्यांनी ३१ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळवून घेतली आहे.

मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसींगवर उड्डाणपुलाच्या कामासाठी दक्षिण पूर्ण मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी DRM दीपक कुमार यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरी दिल्याची माहिती आमदार मुनगंटीवार यांना दिली. मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ९३० वरील रेल्वे क्रॉसींग गेट क्रमांक GCF १२३ येथे उड्डाणपुलाच्या मंजुरीबाबत डीआरएम दीपक कुमार यांनी पत्राद्वारे कळवले आहे. या ठिकाणी अवजड वाहने आणि नियमित वाहतुकीमुळे वारंवार अडथळे निर्माण होत होते.

Sudhir Mungantiwar : कृषी पंप हा चंद्रपूरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क !

स्थानिक नागरिकांनी ही समस्या आमदार मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. लोकांच्या मागणीचा त्यांना सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि रेल्वे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ३१ कोटी रुपये मंजूर झाले. पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी जनतेला दिलेला शब्त पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद आहे, असे आमदार मुनगंटीवार यावेळी म्हणाले. हा उड्डाणपुल केवळ वाहतुकीचाच प्रश्न सोडवणार नाही, तर मुल शहर आणि परिसराच्या सौंदर्यातही भर घालणार आहे. या पुलामुळे शेती, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!