Municipal Council Elections : धुळ्यात दोंडाई नगरपरिषद निवडणुकीत भाजपा नगराध्यक्ष बिनविरोध

NCP’s Sharayu Bhavsar application rejected, challenged in court : राष्ट्रवादीच्या शरयू भावसार यांचा अर्ज बाद, न्यायालयात आव्हान

Dhule: धुळे जिल्ह्यातील दोंडाई नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदावर भाजपची बाजी निश्चित झाली आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांची निवड बिनविरोध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरवण्यात आला. तांत्रिक कारणास्तव आपला अर्ज बाद झाल्याचे जाहीर झाल्यानंतर शरयू भावसार यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

दोंडाई नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून नयन कुवर रावल यांच्या उमेदवारी अर्जासमोर शरयू भावसार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी भावसार यांच्या नावावरील अर्जाला तांत्रिक त्रुटींचा दाखला देत अवैध ठरवल्याची माहिती दिली. या निर्णयानंतर भाजपचे सर्व सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून नयन कुवर रावल यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले.

Pune land scam : पार्थ पवारांना क्लिन चिट नाही, सीडीआर मागवण्याची मागणी!

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने असा दावा करण्यात आला आहे की शरयू भावसार यांच्या वडिलांची घरपट्टी थकबाकी दाखवत भाजपनं आक्षेप नोंदवला आणि त्याचा परिणाम अर्ज बाद होण्यात झाला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी भावसार यांच्या कुटुंबीयांनी धुळे जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे. न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार असून अंतिम निर्णय कसा येतो याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Local body election : नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत तणाव, शिंदे गटात धुसफूस

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेसाठीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या साठ वर्षांत प्रथमच निवडणुकीची शक्यता निर्माण झाली होती. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुने प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु छाननी प्रक्रियेत उज्ज्वला थिटे यांचाही अर्ज अवैध ठरवण्यात आला आणि तेथील निवडणूकही बिनविरोध झाली.

Local body election : नगराध्यक्षपद बिनविरोध, राजकारणात तापल !

अनगर आणि दोंडाई या दोन्ही ठिकाणी विरोधी उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांवर बाद ठरल्यानंतर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चा तापल्या असून या निर्णयांवर पुढील काही दिवसांत न्यायालयात काय घडामोडी होतात याची उत्सुकता आहे.