Municipal Election : महापालिकेत वर्चस्वासाठी मित्र पक्षांमध्येच चूरस!

BJP-Shiv Sena clash, other parties also withdraw from campaigning : भाजप – शिवसेनेत चढाओढ इतर पक्ष प्रचारातही माघारले

Akola : महापालिका निवडणुकीतील प्रचारात रंगत आली आहे. वर्चस्वासाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्येच चूरस निर्माण झाली. भाजपच्या बालेकिल्ल्यात येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मित्र पक्षावर टीकेचे बाण सोडले. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असून समीकरण जुळवण्यासाठी नेत्यांची धडपड आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचारातही चढाओढ दिसून येते. इतर पक्ष मात्र प्रचारात माघारल्याचे चित्र आहे. निवडणुकीत जातीय समीकरण व मतविभाजनाचे गणित महत्त्वपूर्ण ठरेल.

अकोला महापालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. महापालिकेच्या ८० प्रभागांतील २० जागांसाठी ४६९ उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र, शिवसेना शिंदे गट स्वबळावर रिंगणात उतरले. शिवसेना ठाकरे गट सुद्धा स्वबळावर मैदानात असून काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटात आघाडी झाली. भाजपसमोर महायुतीतील घटक मित्र पक्ष शिवसेनेसह विरोधकांचे आव्हान आहे. काही प्रभागांमध्ये वंचित आघाडीचा देखील प्रभाव दिसून येतो. मतविभाजनाचा कळीचा मुद्दा ठरणार आहे. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते. ते टाळण्याचे भाजप नेतृत्वाचे प्रयत्न आहेत.

Municipal election : नाशिकमध्ये १५ प्रभागांत चुरशीचा रणसंग्राम; प्रमुख नेत्यांमध्ये टफ फाइट

भाजपकडून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात आहे. प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महानगर निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल यांच्यावर भाजपच्या प्रचाराची जबाबदारी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेऊन भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. दुसरीकडे ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ओवैसी यांच्या मुस्लीम बहुल भागातील सभेनंतर राजकीय वातावरण तापले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील समस्यांवर बोट ठेऊन आपल्या मित्र पक्षावरच टीकास्त्र सोडले.

Internal Rift in MNS : ‘मनसेला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा डाव’; संतोष नलावडे यांचे खळबळजनक पत्र!

‘नगर विकास’च्या माध्यमातून निधीची हमी देत त्यांनी अकोलेकरांना भगवा फडकवण्याची साद घातली. शहरातील काही प्रभागांमध्ये भाजप व शिवसेना या मित्रपक्षांमध्येच लढत होणार असल्याचे दिसते. विशिष्ट प्रभागात वंचित, ठाकरे गट लढतीमध्ये राहून तिरंगी, चौरंगी लढतीची शक्यता आहे.

अकोला पश्चिम’मधील यशानंतर काँग्रेसने महापालिका निवडणुकीत देखील मुस्लीम बहुल भागावरच जोर दिला. शहरातील उर्वरित भागाकडे पक्षाने दुर्लक्ष केले. युतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील अपवाद वगळता याच भागातील जागा घेतल्या आहेत. ‘एआयएमआयएम’ने ३७ उमेदवार देत काँग्रेस पुढील अडचणी वाढवल्या. मुस्लिमांचा प्रभाव असलेल्या भागात तिरंगी लढतीचे संकेत आहेत. या भागातून अधिकाधिक जागा काढण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे राहील.

Municipal election: इम्तियाज जलील भाजपचे हस्तक असून त्यांनी शहराला व्यसन लावले

भाजप व शिवसेनेचे मोठे नेते अकोल्यात येऊन प्रचार मैदान गाजवत आहेत. मात्र, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते अद्याप प्रचारासाठी आले नाहीत. हेच चित्र नगरपालिका निवडणुकीत होते. त्यामुळे अकोला महापालिकेच्या निवडणुकीत देखील त्या पक्षांचे वरिष्ठ नेते पाठच फिरवणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची धुरा आहे.

__