Municipal Election : मतदारांनो सावधान, शाई पुसल्यास तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो !

Election Commission urgent press conference , what is the real reason : निवडणूक आयोगाची तातडीची पत्रकार परिषद, नेमकं कारण काय?

Mumbai: राज्यात आज 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काही ठिकाणचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर राज्य निवडणूक आयोगाने तातडीची पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांत इशारा देत मतदारांचीही जबाबदारी अधोरेखित केली आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई ही कुठल्याही प्रकारे काढता येईल अशी नाही. ही शाई वेगळी नसून भारतीय निवडणूक आयोग ज्या शाईचा वापर करते, तीच शाई राज्य निवडणूक आयोगाकडून वापरण्यात येत आहे. 2011 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याच प्रकारची शाई वापरली जात असून सध्या ती मार्कर पेनच्या स्वरूपात वापरण्यात येत आहे, असा खुलासा आयोगाने केला.

Thane municipal corporation election: लंडन से आया मेरा व्होटर, व्होटर को सलाम करो

शाई पुसली जात असल्याचा आरोप हा केवळ संभ्रम पसरवण्यासाठी केला जात असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. शाई एकदा ड्राय झाली की ती पुसली जात नाही. याआधी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही अशाच तक्रारी आल्या होत्या, मात्र तपासणीत त्या निराधार ठरल्या होत्या, असे आयोगाने सांगितले. सध्या कोरस कंपनीचा मार्कर पेन वापरण्यात येत असून 2011 पासून एकाच कंपनीचे पेन वापरले जात असल्याची माहितीही आयोगाने दिली.

दरम्यान, हँडवॉश किंवा सॅनिटायझर वापरून बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने हे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. आयोगाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वतः मतदान केले असून त्यांच्या बोटावरील शाई अजूनही तशीच आहे, ती पुसलेली नाही, असे उदाहरण देत आयोगाने हे स्पष्ट केले.

Municipal Election 2026 : उद्याचा निकाल… शाई पुसण्याच्या वादावर फडणवीस यांचे सूचक विधान

दुबार मतदानाच्या शक्यतेबाबत निवडणूक आयोगाने सांगितले की, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काटेकोर खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही मतदाराची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्याला मतदान करू दिले जात नाही. जर एखादा मतदार शाई पुसून पुन्हा मतदानासाठी आल्याचे आढळले, तर संबंधित मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्षावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.

याचबरोबर निवडणूक आयोगाने मतदारांनाही इशारा दिला आहे. शाई एकदा ड्राय होईपर्यंत मतदारांनी ती पुसण्याचा प्रयत्न करू नये. शाई पुसण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य असून अशा प्रकारात मतदारांविरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो, असे स्पष्ट करत आयोगाने मतदारांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन केले आहे.

मतदानाच्या ऐनवेळी निर्माण झालेल्या या वादामुळे निवडणूक प्रक्रियेवर संशयाचे वातावरण तयार झाले असले तरी, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेतून सर्व आरोप फेटाळून लावत कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्याने या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

__