Municipal elections : मोठी बातमी शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती

Major political upheaval at the gates of Mumbai : मुंबईच्या वेशीवर मोठी राजकीय उलथापालथ

Thane : मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजप अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमतात येणार असून, यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. नगरपरिषदेत भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 असे एकूण 32 नगरसेवक एकत्र येत भाजपला बहुमत मिळणार आहे. विशेष म्हणजे, ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्या भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने राजकीय विरोधाभासावर बोट ठेवलं जात आहे.

India-Bangladesh relations : बांगलादेशला भारतात विलीन करण्याची मागणी !

या घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ही अभद्र युती असल्याची टीका शिंदे गटाने केली असून, भाजपने काँग्रेससोबत युती करून शिवसेनेचा घात केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केला आहे. काँग्रेसमुक्त देशाची भाषा करणाऱ्या भाजपने सत्तेसाठी काँग्रेसची साथ घेतल्याने शिंदे गटाच्या जिव्हारी लागल्याचं चित्र आहे.

दरम्यान, भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनीही या युतीवर स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 25 वर्षांपासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटासोबत सत्तेत बसलो असतो, तर तीच खरी अभद्र युती ठरली असती, असा टोला त्यांनी लगावला. अंबरनाथ नगरपरिषदेसाठी महायुतीच्या माध्यमातून शिंदे गटासोबत चर्चा करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा दावाही करंजुले पाटील यांनी केला आहे.

Municipal elections : छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते

अंबरनाथ नगरपरिषद ही भाजप आणि शिंदे गट दोघांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली होती. येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुले यांच्यात चुरशीची लढत झाली होती, ज्यामध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या.

महत्त्वाचं म्हणजे, नगराध्यक्षपद भाजपकडे असलं तरी नगरसेवकांच्या संख्येत शिवसेना शिंदे गट आघाडीवर आहे. नगरपरिषदेतील एकूण 59 जागांपैकी शिंदे गटाने 23 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला 16, काँग्रेसला 12 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आहेत. मात्र सत्तास्थापनेसाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करत शिंदे गटाला बाजूला ठेवल्याने अंबरनाथच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

__