Municipal Elections : निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा

The opposition is not campaigning, criticizes Devendra Fadnavis : विरोधक प्रचारात नाहीत, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Mumbai: महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुका आणि त्यांना अचानक पुढे ढकलण्यात आलेल्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रचारात दिसत नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. जे कार्यकर्ते आपल्यासाठी घराघरात फिरतात, मेहनत करतात, त्यांच्यासाठी आपण फिरत नाही, मदत करत नाही हे योग्य नाही. त्यांना माहितीय की या निवडणुकीत ते हरणार आहेत, म्हणून पराभवाचा शिक्का माथी लावून घ्यायचा नाही म्हणूनच ते प्रचारापासून दूर राहिले आहेत,” असे फडणवीस म्हणाले.

सत्ताधारी किंवा विरोधक यावरून निवडणूक प्रक्रियेत कुणालाही सूट मिळू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कोणी सत्तेत आहे, कोणी सत्तेबाहेर आहे यावरून रेड ठरवत नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांवरही तक्रार आली तर कारवाई होते. माझी स्वतःची गाडी अनेक वेळा तपासली गेली आहे. यामध्ये सत्ताधारी-विरोधक असे काही नसते,” असे फडणवीस यांनी सांगितले.

Municipal Elections : 22 नगरपरिषदांच्या निवडणुका अखेर पुढे ढकलल्या !

नगरपरिषद निवडणुका उद्याच होणार असतानाच त्याच्या एक दिवस आधी अचानक काही ठिकाणी निवडणुका रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या जातील असे आजवर कधीच झाले नव्हते. हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. निवडणूक आयोग कुठला कायदा काढत आहे आणि कोणाचा सल्ला घेत आहे ते स्पष्ट नाही.”

फडणवीस यांनी निलंगा येथील उदाहरण देत आरोप अधिक बळकट केले. “मी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी बोललो. सर्व प्रक्रिया पूर्ण, सर्वांना प्रचाराची वेळ मिळाली. कोणा एकाचा फॉर्म रद्द झाला, तो कोर्टात गेला आणि कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केलाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यास काहीही कारण नव्हते. कोणातरी पार्टी केली होती म्हणून निवडणुका थांबवणे चुकीचे आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, पण कायदेशीरदृष्ट्या हा निर्णय चुकीचा आहे,” असे ते म्हणाले.

प्रामाणिकपणे उमेदवारी भरलेल्या आणि प्रचारात मेहनत केलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे सांगत फडणवीस यांनी आयोगाकडे प्रतिनिधित्व देण्याचाही इशारा दिला. “निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे होते. नगरविकास विभागाचा याच्याशी काहीही संबंध नाही. हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. कलेक्टरांनी फक्त आपले मत मांडले. आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागतो, पण तो निर्णय चूक आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar :मुनगंटीवारांनी धमाकेदार घोषणा करत मुलवासियांना दिला दिलासा

भाजपच्या सर्व्हेनुसार 75 नगराध्यक्ष जिंकणार असल्याचे काही वृत्त येत असतानाच त्याबाबत विचारता फडणवीस म्हणाले, “असा काही सर्व्हे झाल्याची मला माहिती नाही. पण भाजप हा राज्यात क्रमांक 1 पक्ष आहे आणि आमचे मित्र पक्ष त्या खालोखाल असतील.”

नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावरून राज्यातील वातावरण अधिकच चुरशीचे झाले असून पुढील काही दिवसांत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणखी आरोप–प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.