Demands for SIT probe into teacher recruitment scam : शिक्षक भरती घोटाळ्यावर आक्रमक, सभापतींना पत्र
Nagpur बोगस शिक्षक व कर्मचारी भरती घोटाळ्यासंदर्भात माजी आमदार नागो गाणार यांनी परत आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना पत्रदेखील पाठविले आहे.
नागपूर, अमरावती, लातूर, परभणी, नांदेड, नाशिक, सोलापूर, पुणे, मुंबई आदी जिल्ह्यांत बोगस शिक्षक नियुक्ती, शालार्थ आयडी आणि अल्पसंख्याक दर्जा घोटाळ्याच्या शेकडो तक्रारी आल्या आहेत. नागपूरमध्ये या संदर्भात एफआयआर दाखल होऊन काही अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. तसेच २०१९ पासून सुमारे ५८० बोगस नियुक्ती प्रकरणे समोर आली आहेत.
Minister Akash Fundkar : बियाणे-खतांची साठेबाजी करणाऱ्यांना सज्जड दम
घोटाळ्याची व्याप्ती विचारात घेता एसआयटी चौकशी आवश्यक आहे. या प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात आहे. सरकारकडून आतापर्यंत एसआयटी स्थापन व्हायला हवी होती. या प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी गाणार यांनी केली आहे.
Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारले तर बँकांची खैर नाही
मे २०१२ रोजी शासनाने शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी आणली असतानाही राज्यभरात शेकडो शिक्षक नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने झाल्या. शिक्षण आयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीत ५९ शिक्षणाधिकाऱ्यांना दोषी ठरवून शिस्तभंगाची शिफारस केली गेली. मात्र, हा प्रस्ताव सात-आठ वर्षांपासून मंत्रालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावला आहे. सदर प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांची अमाप संपत्तीही उघडकीस आली आहे.