City president of NCP Sharad Pawar lost : शहराध्यक्ष पराभूत, अजित पवारांचा एकच उमेदवार विजयी
Nagpur शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना विधानसभेनंतर महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा पराभवाचा धक्का बसला होता. मागील महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ते एकमेव निवडून आलेले उमेदवार होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व परिवहन समितीचे माजी सभापती भाजपच्या बाल्या बोरकर यांनी यावेळी त्यांना पराभवाचा धक्का दिला.
प्रभाग क्रमांक २३मधून भाजपचे बोरकर यांनी राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांच्यात थेट लढत झाली. मागील निवडणुकी दोघेही वेगवेगळ्या गटातून लढले होते. आपसात लढण्याचे दोघांनी टाळले होते. या प्रभागातील तीन भाजपचे व एक राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. यावेळी आरक्षणामुळे दोघांवर एकाच गटात लढण्याची पाळी आली होती. यात भाजपच्या बोरकर यांनी बाजी मारली. यापूर्वी बोरकर यांनी काँग्रेसच्या महापौर नरेश गावंडे यांना पराभवाचा धक्का दिला होता.
Nagpur municipal corporation election : माजी आमदार महापालिकेची निवडणूक हरले
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला होता. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे निवडून आल्या आहोत. त्यामुळे राष्ट्रवादीचे महापालिकेत एकचे संख्याबळ कायम राहणार आहे. पांडे या मागील निवडणुकीत अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत समावेश केला. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत दुनेश्वर पेठे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते.
Nagpur municipal corporation elections : दोघांच्या भांडणात भाजपला फायदा, काँग्रेसला धक्का
यात दोघांचाही पराभव झाला. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे विक्रमी मतांनी निवडून आले. अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी महापालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळी लढली होती. अजित दादांच्या राष्ट्रवादीने ८७ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ७८ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काही ठिकाणी एकमेकांना समर्थन जाहीर केले होते. त्याचाही काही फायदा पेठे यांना झाला नाही.








