Fear of losing vote bank due to new ward formation : नगरसेवकपदाच्या स्वप्नात खोडा; व्होट बँक दुसऱ्या प्रभागात जाण्याची भीती
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी ाता जोरात सुरू झाली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देखील इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून सज्ज आहेत. मात्र नव्या प्रभागरचनेमुळे नगरसेवकपदाचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपली व्होट बँक दुसऱ्या प्रभागात गेली, तर काय करायचे, असा प्रश्न इच्छुकांपुढे निर्माण झाला आहे.
२०१७ च्या पॅटर्ननुसारच चार-सदस्यीय पॅनल पद्धतीने ही निवडणूक पार पडणार आहे. महापालिकेची मुदत ४ मार्च २०२२ रोजी संपली आणि त्यानंतर सत्तेचा ताबा प्रशासकांकडे गेला; मात्र आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता असून, पुन्हा एकदा महापालिकेत लोकप्रतिनिधींना संधी मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने प्राथमिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यात प्रभाग रचनेच्या टप्प्यांसह वेळापत्रकही ठरले आहे.
Dr. Babanrao Taywade : कायद्यातील दुरुस्तीशिवाय जातनिहाय जनगणना अशक्य
दरम्यान, निर्देशानुसार प्रभागाची फेररचना निर्धारित कालावधीत पूर्ण होईल, असे कळते. नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर हक्काची व्होट बँक असलेला परिसर दुसऱ्या प्रभागात गेला तर काय? हक्काची मते दुसऱ्या उमेदवाराच्या प्रभागात गेली तर काय होईल ? या विचारांनी अनेक माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. काही जण प्रत्यक्षात प्रभागातील गल्ल्या, वस्त्या पाहत आहेत, तर काहींनी कार्यकर्त्यांच्या बैठकीस सुरुवात केली आहे.
Vanchit Bahujan Aghadi : बी-बियाणे, खते व पिकविमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
शहराच्या विस्तारामुळे मागील सात वर्षांत अनेक प्रभागांमध्ये लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरालगत असलेल्या हुडकेश्वर, नरसाळा, पिपळा, जरीपटका, वाठोडा अशा प्रभागांमध्ये मतदारांची संख्या ७० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. परिणामी, या भागांमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाग रचना करताना केवळ लोकसंख्या नव्हे तर भौगोलिक सुसंगती, आरक्षणाचा ताळमेळ, प्रभागाचा आकार आणि संतुलित विभागणी करावी लागणार आहे.