Nagpur municipal corporation election : कट्टर समर्थकांना उमेदवारी नाकारली, नव्या चेहऱ्यांना संधी

Gadkari and Fadnavis denied candidature to their own steong supporters : भाजपच्या रणनितीने अनेकांना धक्का, बंडखोरीची शक्यता

Nagpur महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत यंदा अनेक दिग्गजांना घरी बसवले. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, नितीन गडकरी यांच्या कट्टर समर्थकांचा समावेश आहे. तीन ते चार टर्म नगरसेवक राहिलेल्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे काही लोकांनी बंडखोरी केल्यास आश्चर्य वाटणार नाही.

भाजपने धक्का दिलेल्या नगरसेवकांमध्ये मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक व नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त संजय बंगाले, माजी महापौर अर्चना डेहनकर, स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश भोयर, स्थायी समितीचे माजी सभापती व सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, ज्येष्ठ सदस्य चेतना टांक, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे, माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Municipal election : शिवसेना शिंदे गटाला महापालिका रणधुमाळीत मोठा धक्का

मागील निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. सत्ता आल्यानंतर सुमारे ८० टक्के नगरसेवक प्रभागात फिरकलेच नाहीत. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर निष्क्रिय राहिलेल्या नगरसेवकांच्या तिकिटा कापण्याचा इशारा भाजपने दिला होता. तो खरा ठरला आहे. भाजपने बंडखोरीच्या भीतीने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मात्र ज्यांना तिकिटे द्यायचे होते त्यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बोलवून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

उद्या सर्वच उमेदवार उमेदवारी दाखल करणार आहेत. कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विक्की कुकरेजा, बाल्या बोरकर, बंटी कुकडे, माजी महापौर मायाताई इवनाते, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील यांना मात्र आपले तिकीट राखण्यात यश आले आहे.

Kishor jorgewar exposed : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भूकंप; भाजपाचे आमदार जोरगेवारांच्या पीएच्या पत्नीने भरला अपक्ष अर्ज

भाजपने उमेदवारी देण्यापूर्वी इच्छुक तसेच संभाव्य उमेदवाराचा सर्वे केला होता. याशिवाय महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतरही नगरसेवकांना आपले कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश देऊन त्यांना नागरिकाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही अनेकांनी कार्यालय सुरू केले नाहीत. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत अशा सर्वांच्या तिकिटे कापण्यात आल्याचा दावा भाजपतर्फे केला जात आहे. अद्यापही ३५ जागांवर भाजपात उमेदवारांच्या नावावरून एकमत झालेले नाही.

रात्री उशिरा नितीन गडकरी यांच्या घरी परत एकदा भाजपचे आमदार आणि कोअर समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचे समजते. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला होता. यापैकी काहींच्या नावाला भाजपातूनच विरोध होत असल्याचे समजते.