Nagpur municipal corporation election : माजी आमदार महापालिकेची निवडणूक हरले

Prakash gajbhiye lost the municipal corporation election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये पराभूत

Nagpur शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा महापालिकेची निवडणूक मात्र पराभव झाला. प्रथमच महापालिकेची निवडणूक लढत असलेले भाजपचे उमेदवार योगेश पाचपोर यांनी धक्का देऊन त्यांचे पुन्हा महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होण्याचे मनसुबे उधळून लावले. एकेकाळी गजभिये यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग १३ मधून भाजपचे चारही उमेदवार निवडून आले आहेत.

प्रकाश गजभिये यांना शरद पवार यांनी विधान परिषदेवर पाठवले होते. ते सहा वर्ष आमदार होते. विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. राजकारणात सक्रिय राहाता यावे यासाठी त्यांनी यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे १५ वर्षानंतर महापालिकेच्या राजकारणात परतण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मात्र भाजपने यश मिळू दिले नाही. ते एकेकाळी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे समर्थक होते.

 

Nagpur municipal corporation elections : दोघांच्या भांडणात भाजपला फायदा, काँग्रेसला धक्का

आठवले शरद पवार यांना सोडून भाजप महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. मात्र गजभिये यांनी पवारांची साथ सोडली नाही. याचे बक्षीस आमदार करून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. मात्र राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले. त्यामुळे प्रकाश गजभिये यांची परत विधान परिषदेत जाण्याची वाट अवघड झाली होती. त्यामुळे त्यांनी आपली महापालिकाच बरी म्हणून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.

ते निवडणूक लढलेल्या प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपचे योगेश पाचपोर, रुतिका मसराम, वर्षा चौधरी आणि विजय होले हे चारही नगरसेवक निवडून आहेत. आमदार डॉ. परिणय फुके यांच्यावर भाजपने या प्रभागाची जबाबदारी सोपवली होती. याच प्रभागात भाजपने होले यांच्यासह किसन गावंडे यांनाही एबी फॉर्म दिला होता. मात्र गावंडे यांचा एबी फॉर्म बाद झाला. त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊ नये यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोंडून ठेवले होते.

Election results 26 : आमदार जोरगेवार यांची मनमानी, उमेदवार बदलले, एबी फॉर्म विकले; चंद्रपूर महापालिकेत भाजपला मोठा फटका

त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. शेवटी परिणय फुके यांना त्यांची समजूत घालावी लागली होती. या प्रभागातून परिणय फुके यांनी दोन वेळा महापालिकेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी परिणिता फुके यांनीही दोन वेळा निवडणूक जिंकून भाजपसाठी हा प्रभाग भक्कम केला होता. त्याचे फळ भाजपच्या चारही उमेदवारांना चाखायला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत प्रभाग १३ने
काँग्रेसला सुमारे २५०० मतांची आघाडी दिली होती. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सुमारे ३ हजार ३०० मतांची आघाडी मिळाली होती. मात्र, महापालिका निवडणुकीत आमदार डॉ. परिणय फुके यांची चित्र पालटले. भाजपला सुमारे सहा हजार मतांची आघाडी मिळवून दिली.