Congress lost big seat in Nagpur : खुर्ची नाट्य भोवले, माजी सत्तापक्षनेते वनवे पराभूत
Nagpur नागपूर महापालिकेतील काँग्रेसचे माजी सत्तापक्षनेते तानाजी वनवे पराभूत झाले आहेत. विरोधी पक्षात असताना महापालिकेत वनवे आणि काँग्रेसचे संजय महाकाळाकर यांच्यात सत्तापक्ष नेतेपदावरून झालेले खुर्चीनाट्य चांगलेच गाजले होते. त्यावेळी वनवे यांनी खुर्ची पटकावली होती. मात्र निवडणुकीते त्यांना आपली खुर्ची वाचवता आली नाही. त्यांच्याकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी आशा होती.
काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसमधील दुसऱ्या गटाने तानाजी वनवे यांच्या सत्तापक्षनेत्याच्या खुर्चीवर बसवले होते. यावरून मोठा राडा झाला होता. एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या खुर्ची नाट्यात शेवटी वनवे यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत ठाकरे हेसुद्धा पराभूत झाले होते. त्यानंतर नामनिर्देशित नगरसेवक होऊ देण्यापासून रोखण्यासाठी वनवे यांना समोर करून ठाकरे यांच्या विरोधकांनी मोठी खेळी खेळली होती. त्यावेळी काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते.
यापैकी अधिक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन विभागीय आयुक्तालयात नोंदणी करण्यात आली होती. त्यामुळे महाकाळकर यांना सत्तापक्षनेते पदाची खुर्ची सोडावी लागली होती. त्यानंतर सुमारे साडेचार वर्ष वनवे हे या खुर्चीवर विराजमान होते. विकास ठाकरे पुन्हा तिकीट देणार नाही हे बघून त्यांनी वर्षभरापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अलीकडेच त्यांची प्रदेश महासचिव म्हणून पदोन्नती केली होती. भाजपसोबत युती होईल अशी आशा वनवे यांना होती. मात्र त्यांचा अंदाज फसला. येथेत वनवे यांचा घात झाला. प्रभाग क्रमांक २७ मधून त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रशांत धवड यांना उतरवले होते. दोघांच्या भांडणात भाजपचे प्रवीण गिऱ्हे निवडून आले आहेत.








