Nagpur Municipal Corporation : तक्रार निवारण करण्यात मनपाला ‘फाईव्हस्टार रेटिंग’

 

‘Five Star Rating’ for Municipal Corporation in Grievance Redressal : दीड महिन्यांत नागपूरकरांच्या १४२३ तक्रारींचे निवारण

Nagpur महानगरपालिकातर्फे नागरिकांच्या सोडविलेल्या तक्रारीचे निवारण झाल्यावर नागरिक स्वत: फिडबॅक देत असतात. त्यानुसार १ डिसेंबरपासून १४३४ तक्रारींपैकी १४२३ तक्रारींचे निवारण करण्यात आले. याविषयी नागरिकांचे फिडबॅक जाणून घेतले असता नागरिकांकडून ८८८ तक्रार निवारणावर फाईव्हस्टार रेटिंग देण्यात आले आहे. तसेच २७९ तक्रारींवर ४ स्टार रेटिंग तर १२४ तक्रारींवर १ स्टार रेटिंग मिळाले आहे.

अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मनपाच्या तक्रार निवारण प्रणालीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या रेटिंगच्या संदर्भात माहिती देण्यात आली. महानगरपालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. शहरातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता महानगरपालिकेने ऑनलाइन पोर्टल सुविधा सुरू केले आहे. त्यानुसार मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

Dr. Suresh Mane : ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यावरच निवडणूका!

बैठकीत गोयल यांनी झोनचे सर्व सहायक आयुक्त, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना ऑनलाइन स्वरूपात नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारी सोडविण्याचे निर्देश दिले. याशिवाय ज्या भागातून तक्रार आली आहे, त्या ठिकाणी सहायक आयुक्त यांनी भेट द्यावी. झोनस्तरावर आलेल्या तक्रारीचा आढावा सतत घ्यावा. तक्रारीची योग्य दखल घेत नागरिकांना ऑनलाइन उत्तरे देण्यात यावीत, असे निर्देश दिले.

महानगरपालिकातर्फे नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. सध्या टोल फ्री क्रमांकाची चाचणी सुरू आहे, चाचणी पूर्ण होताच नागरिकांकरिता हे टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या टोल फ्री क्रमांकावरून नागरिकांची तक्रार नोंदवून दरदिवशी त्याचे मॉनिटरिंग केले जाऊन त्या सोडवण्यात येतील, असे गोयल यांनी म्हटले.

Mahayuti Government : हे कसले Cost Cutting? आमदारांना ८२ लाख रुपयांच्या बॅग !

ही तर कमालीच झाली!
नागपूर महानगरपालिका लोकांच्या तक्रारींचे निवारण करत नाही, अशीच तक्रार कायम होत असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहरातील तक्रारी मोठ्या प्रमाणात येतात. गडकरींनी काही महिन्यांपूर्वी महापालिकेत जनसंपर्क कार्यक्रम घेतला होता. यावेळी शहरातील नागरिकांनी आपल्या समस्यांसह मोठी गर्दी झाली होती.