Nagpur municipal corporation : महापालिकेची निवडणूक आटोपली, आता मालमत्ता करवाढ होणार

 

Mayor-Neeta-Thackeray-property-tax-hike : महापौरांनी दिले पहिल्याच बैठकीत संकेत, अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

Nagpur महापालिकेच्या निवडणुकीमुळे मालमत्ता करवाढ रोखून ठेवण्यात आली होती. आता निवडणुका आटोपल्या. भाजपने सत्ता स्थापन केली. महापौर नीता ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच आढावा बैठकीत मालमत्ता कर तसेच इतर माध्यमातून मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना सूचविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

या माध्यमातून त्यांनी मालमत्ता करात दरवाढ करण्याचे संकेत दिले आहे. हे बघता सत्तेवर येताच सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या खिशात घालण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते.
नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे यांनी बुधवारी आयुक्त सभाकक्षात मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन घेतली. विविध विकास प्रकल्पांची सद्यःस्थिती तसेच प्रस्तावित विकास प्रकल्पांचा विभागनिहाय आढावा घेतला.

तीन तास चाललेल्या बैठकीत शहरातील उत्पन्नाचे स्रोत वाढविणे तसेच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, सर्व बाजारपेठांमध्ये रात्री स्वच्छता करणे, दूषित पाण्याच्या समस्यांवर उपाययोजना व पादचाऱ्यांसाठी फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कडक पाऊल उचलण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

Vanchit bahujan aghadi : योजनांच्या बॅनरवरून महापुरुषांचे फोटो वगळले, फ्लेक्स जाळून निषेध

नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील मालमत्ता कर तसेच इतर माध्यमातून मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्याचे त्यांनी निर्देश दिले. शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, मनपाच्या उद्यानांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच घनकचरा व्यवस्थापन योग्यरीतीने करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी विविध सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

Panvel Municipal Corporation : पनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नितीन पाटील

शहरात रेन हार्वेस्टिंगचा अधिकाधिक नागरिकांनी वापर करावा, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे तसेच नियमांमध्ये तशी सक्त तरतूद कराव्या, असेही यावेळी सुचविण्यात आले. शहरातील मोकाट श्वानांच्या बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे तसेच विधान सभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी २ इंग्रजी शाळा सुरू करणे, अंबाझरी तलावातून जलपर्णी कशी हटविण्यात येईल याची उपाययोजना करण्यासाठी निर्देश महापौरांना दिले.