Breaking

Nagpur Municipal Corporation : महापालिका उदार झाली, लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

Municipal Corporation distributes cheques to beneficiaries : मनपा महिला उद्योजिका मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात रविवारी गायक व संगीतकार हृषिकेश रानडे व त्यांच्या चमूने सादर केलेल्या हिंदी, मराठी गाण्यांवर नागपूरकर चांगलेच थिरकले. रविवारी महिला उद्योजिका मेळाव्याला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘रेकॉर्डब्रेक’ गर्दी केली. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थीना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग, बचत गट, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना अशा विविध लाभार्थ्यांना योजनेतील लाभाचे धनादेश प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त प्रकाश वराडे सहायक आयुक्त विकास रायबोले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, डॉ. मंजुषा मठपती आदी उपस्थित होते.

Vijay Wadettiwar : वाढत्या गुन्हेगारीवरून वडेट्टीवार, जयंत पाटील सरकारवर तुटून पडले!

रविवारी हृषिकेश रानडे यांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सूर निरागस या गाण्याने करण्यात आली. सुर निरागस या गाण्यानंतर मन उधाण वाऱ्याचे. … आनंद घना….. क्या जानू सजन… तुम मिले दिल खिले…कधी तू…. नीले नीले अंबर पर चांद जब आये… तेरी दिवानगी…..ये श्याम मस्तानी…….. आओगे जब मोह मोह के धागे…. एक हसीना थी……… अधीर मन झाले…… गाता रहे मेरा दिल……. मधुबन मे राधिका… कजरा मोहब्बत वाला… अरे दिवानो….. अश्विनी ये ना….या गाण्याचे सादरीकरण हृषिकेश आणि स्वाती, सागर आणि निकिता यांनी केले.

महिला उद्योजिका मेळाव्यात रविवारी मनपाचे सहायक आयुक्त विजय थूल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आदी विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वृषाली देशपांडे यांनी केले व आभारही मानले.

विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरित
दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयं रोजगारासाठी वैयक्तिक तथा सामूहिक बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी प्रति लाभार्थी ९५ हजार रुपये असे १०० दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत अनुदान देण्यात आले. त्याचबरोबर दिव्यांगाना साहित्य खरेदी करण्यासाठी प्रती लाभार्थी ६० हजार रुपये प्रमाणे २९ दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना १७.४० लक्ष अनुदान डीबीटी अंतर्गत देण्यात आले.

Sanjay Raut-Vijay Wadettiwar : राऊत म्हणाले, धंगेकर सत्तेच्या वळचणीला लागले!

यावेळी आलीशा रिझवान, श्रुती गेडाम यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजेअंतर्गत घटक क्र ३, घटक ४ व रमाई आवास योजने अंतर्गत निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना किंवा दिव्यांग असल्यास त्यांना या योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त मनपा कडून ५० हजार प्रति लाभार्थी रक्कम अर्थसहाय्य देण्यात येते.