Nagpur municipal corporation : नागपुरात खऱ्या अर्थाने ‘महिला राज’! १० मिनी महापौरही महिलाच होणार

nagpur-corporation-women-empowerment-news : स्थायी समितीसह सर्व १० झोनमध्ये महिलांनाच संधी; मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्णी 

Nagpur नागपूर महानगरपालिकेत आता खऱ्या अर्थाने ‘महिला राज’ अवतरणार आहे. महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे महिलांकडे सोपवल्यानंतर, आता शहरातील सर्व १० झोनचे सभापती (मिनी महापौर) आणि स्थायी समितीचे अध्यक्षपदही महिलांनाच देण्याचा ऐतिहासिक निर्णय भाजपने घेतला आहे.

आरक्षण सोडतीनुसार महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्याने नीता ठाकरे यांची महापौर म्हणून निवड झाली आहे. उपमहापौरपदी भाजपने लीला हातीबेड यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेची तिजोरी ज्यांच्या हाती असते, त्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी शिवानी दाणी यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

Mumbai climate week : ‘मुंबई क्लायमेट वीक’ म्हणजे केवळ दिखावा; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्ला

नागपूर महापालिकेच्या १० झोनमधील सभापतींना ‘मिनी महापौर’ म्हटले जाते. पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार, या सर्व १० झोनमध्ये महिला नगरसेविकांचीच सभापती म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, मंगळवारी होणाऱ्या विशेष सभेत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Politics democracy values : ‘राजकीय समता’ केवळ भाषणापुरतीच मर्यादित? लोकशाही मूल्यांच्या व्यवहार्यतेवर मंथन

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने नागपूर मनपाच्या १५१ जागांपैकी ७६ जागांवर महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. केवळ आरक्षणापुरते मर्यादित न राहता, सर्व महत्त्वाची धोरणात्मक पदे महिलांना देऊन भाजपने राज्यात महिला सक्षमीकरणाचा एक मोठा संदेश देण्याच्या प्रयत्नात आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष बैठकीत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड आणि विविध समित्यांच्या घोषणा केल्या जातील, ज्यामध्ये महिलांचेच वर्चस्व पाहायला मिळणार आहे.