Nagpur Municipal Corporation : लोकांचे अतिक्रमण काढणाऱ्या मनपानेच केले अतिक्रमण!

NCP encroached on farmer’s land for STP : शेतकऱ्याची जमीन हडपली; जयताळ्यातील एसटीपी वादात

Nagpur लोकांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी क्षणाचाही विलंब न करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेनेच एका शेतकऱ्याची जमीन हडपल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मनपाने एका प्रकल्पासाठी शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. जयताळा परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जयताळा भागात नागपूर महापालिकेचा सिवरेज ट्रिटमेंट प्लॅण्ट (एसटीपी)चा प्रकल्प सुरू आहे. त्याचे झपाट्याने काम सुरू आहे. या कामासाठी महापालिकेकडून कुठलीही परवानगी न घेता प्रकल्पासाठी शेजारील शेतीवर अतिक्रमण करून शेती निरुपयोगी बनवीत आहे. जयताळा येथील खसरा क्रमांक १७०/१, १५९/४, १५९/५, १५९/६ व १६१ येथील शेतजमिनीवर हा प्रकार झाला आहे.

High Court Nagpur : पणनमंत्र्यांना उच्च न्यायालयाची नोटीस!

एसटीपीचा हा प्रकल्प महापालिका सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीवर बांधत असली तरी, एसटीपीचे चेंबर शेतमालकाच्या शेतीवर उभारण्यात आले आहे. पाइपलाइन शेत खोदून टाकण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने संबंधित शेतमालकाची कुठलीही परवानगी घेतली नाही. उलट त्यांच्या शेतीवर बांधकामाचे कार्यालयदेखील बांधले.

Ravi Bhawan Naag Bhawan : दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च, तरीही मंत्र्यांच्या घरांना वाळवी

गेल्या दोन महिन्यांपासून हे काम सुरू आहे. खसरा क्रमांक १६१ मध्ये असलेल्या शेतजमिनीच्या मधून पाइपलाइन टाकण्यात आली व पाच एसटीपी चेंबर उभे करण्यात आले. त्यामुळे ही जमीन आता कुठल्याही उपयोगाची राहिली नाही. खसरा क्रमांक १५९/६ वरील जमिनीवर अवैधपणे उत्खनन करून पाइपलाइन टाकण्यात आली, तर १७०/१, १५९/४ व १५९/५ मध्ये अवैध मुरुम व मातीचा साठा टाकण्यात आला आहे.

Operation Prahar : अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’; अवैधतेचा अंत, प्रहाराचा प्रारंभ

त्यात दूषित पाणी सोडण्यात आले आहे. या शेतजमिनीचे संपूर्ण विद्रुपीकरण करण्यात आलेले आहे. यासंदर्भात शेतमालकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. सरकारी प्रकल्प राबविताना त्यासाठी आवश्यक जमिनीवर बांधकाम करायचे असेल किंवा खोदकाम करायचे असेल तर संबंधित जमीनमालकाची परवानगी घेणे गरजेचे आहे.