Nagpur Municipal Corporation : नागपूर मनपावर महिलाराज! नीता ठाकरे नव्या महापौर, तर महापालिकेची तिजोरीही शिवानी दाणींच्या हाती

Neeta Thakre is Nagpur’s new Mayor : नागपूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच तिन्ही प्रमुख पदांवर महिलांची वर्णी

Nagpur गेल्या पंधरा दिवसांपासून नागपूरच्या महापौरपदाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, नागपूर महापालिकेच्या तिन्ही महत्त्वाच्या पदांची सूत्रे महिलांकडे सोपवून एक नवा इतिहास रचला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी आज महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींच्या नावांची अधिकृत घोषणा केली.

या निवडीमध्ये नीता ठाकरे यांच्याकडे महापौरपद, लीला हातीबेड यांच्याकडे उपमहापौरपद तर शिवानी दाणी यांच्याकडे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेची ‘तिजोरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे नेतृत्व एका तरुण महिला नगरसेविकेकडे सोपवून भाजपने सर्वांना चकित केले आहे.

NCP leadership : राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर घमासान, प्रफुल पटेलांच्या भूमिकेकडे लक्ष !

नागपूर महापालिकेत भाजपचे १०२ नगरसेवक असून महापौरपद महिलेसाठी राखीव झाल्यापासून अनेक नावांची चर्चा होती. नीता ठाकरे या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. गेल्या २० वर्षांपासून दक्षिण नागपूरला महापौरपद मिळाले नव्हते, त्यामुळे आमदार मोहन मते यांनी यावेळेस आग्रही मागणी केली होती. प्रदीर्घ अनुभव आणि ज्येष्ठता लक्षात घेऊन पक्षाने नीता ठाकरे यांना पसंती दिली आहे.

महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवानी दाणी यांना पक्षाने स्थायी समितीचे सभापतिपद दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आणि दक्षिण-पश्चिम नागपूरच्या नगरसेविका असलेल्या दाणी पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. मात्र, त्यांची गुंतवणूक सल्लागार म्हणून असलेली ओळख आणि प्रशासकीय समज पाहता त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Ajit Pawar death : बुलढाणा मेडिकल कॉलेजला ‘अजितदादां’चे नाव द्या; सर्वपक्षीय सभेत एकमुखी ठराव

दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी आधी संजय बालपांडे यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याने पक्षाने लीला हातीबेड यांची निवड केली. यापूर्वी चार दिवसांपूर्वीच नरेंद्र बोरकर यांची सत्तापक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे आता महापालिकेतील भाजपची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.