Breaking

Nagpur Municipal Corporation : नागपुरात होणार स्वच्छता सर्वेक्षण!

 

Sanitation survey to be held in Nagpur : नागपूर महापालिकेची तयारी, आयुक्तांकडून झोननिहाय आढावा

Nagpur शहरात ठिकठिकाणी बांधकाम आणि पाडकाम कचरा बांधकामाच्या ठिकाणी आढळून येत आहे. या पार्श्वभूमीव स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिका तयारीला लागली आहे. लवकरच शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची चमूद्वारे पाहणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने दहाही झोनमध्ये सुरू असलेले स्वच्छतेचे कार्य आणि आवश्यक कामाचा आढावा मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतला.
या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीबाबत सादरीकरण करण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेसंबंधी कार्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील दहाही झोनमध्ये ह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीच्या प्रतिनिधींद्वारे कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत नियमित जनजागृती करण्यात येत आहे.

या जनजागृतीद्वारे झोनमध्ये आवश्यक कार्यांचीदेखील माहिती यावेळी सादर करण्यात आली. शहराला स्वच्छ ठेवण्यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच त्याकरिता सर्व कार्यकारी अधिकारी, झोनल अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन, रस्त्याच्या कडेवरील स्वच्छता, फुटपाथवरील स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व सुव्यस्था, घरोघरी कचरा व्यवस्थापन, शाळेतील स्वच्छता, वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, नदी व नाला स्वच्छता, कचऱ्यावर होणारी प्रक्रिया, होम कम्पोस्टिंग, बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन या सर्व ठळक बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

Hair loss disease : चर्चा, बैठकांमध्ये केस गळतीचा लागेना सोक्षमोक्ष !

बैठकीमध्ये नदी व नाला स्वच्छतेवर भर देण्यात आला. नाल्यातील झाडीझुडपे तसेच कचरा स्वच्छ करण्यात यावा. शहरातील वायू गुण निर्देशांक सुधारण्यावर काम करा असे आयुक्त म्हणाले. झोनल अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या या संपूर्ण कार्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

Shivsena Uddhav Balasaheb thakarey : शिवसेनेचे ‘एकला चलो’ छोट्या गावांमधून

सुरुवात महापालिकेतून करावी लागणार
नागपूर महानगरपालिकेच्या जुन्या व नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्वच्छता सर्वेक्षण करून या अभियानाची सुरुवात करावी लागणार आहे. जुन्या इमारतीमधील कोपरे असोत अथवा नवीन इमारतीमधील लिफ्ट असो, अनेक ठिकाणी थुंकलेले दिसते. साफसफाई केली तरीही पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. यावरून महापालिकेलाच स्वच्छतेची शिस्त लागण्याची गरज आहे, असे बोलले जात आहे.