Projects of the municipal contractors stopped : मनपातील कंत्राटदारांचे बिल थांबले, प्रकल्प रखडले
Nagpur राज्य सरकारने शहराच्या पायाभूत विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला मंजूर केला. परंतु, त्याची पूर्तता महापालिकेला झाली नाही. यामुळे अनेक कंत्राटदारांची बिले रखडली असून काम बंद पडली आहेत. या सर्वांचा फटका विकासकामांना बसतो आहे. त्यामुळे महापालिकेने ६८३ कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
शहरातील पायाभूत सुविधांच्या कामासाठी २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत राज्य सरकारने महापालिकेला १,९८७.६० कोटींचा निधी मंजूर केला, मात्र यापैकी आतापर्यंत केवळ ३५७.१२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. त्यापैकी महापालिकेला केवळ ४२.९२ कोटी रुपये मिळाले आहेत.
Shambhuraj Desai : लोणार सरोवर येथील सोयीसुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
निधी न मिळाल्याने शहरात सुरू असलेले काही विकास प्रकल्प संथ गतीने सुरू असून, कंत्राटदारांनी देयके प्रलंबित आहे. निधीअभावी परिणाम झालेल्या प्रकल्पांमध्ये नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ७७०.८३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना सर्वाधिक फटका बसला. या प्रकल्पांसाठी केवळ ८८.०९ कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, यापैकी केवळ २०.१६ कोटी रुपयेच महापालिकेला प्राप्त झाले.
त्याचप्रमाणे महसूल आणि वनविभागाकडून पुरामुळे नुकसान झालेल्या कामांसाठी २०४.७२ कोटी मंजूर झाले होते. मात्र, मिळाले केवळ १४.५१ कोटी. अमृत २.० प्रकल्पांतर्गत राज्य सरकारकडून ९५७.०१ कोटी मंजूर झाले आहेत. यापैकी २३९.२५ कोटी वितरित करण्यात आले आहेत. मात्र महापालिकेला अजूनही यापैकी एक रुपयाही मिळालेला नाही.
Local Body Elections : राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोइंग वाढले
सोनेगाव तलाव, गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडलेले आहे. लवकरात लवकर निधी न मिळाल्यास शहरातील अनेक महत्त्वाची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे.