Congress appoints committee to inspect riot-hit areas in Nagpur : स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार
Mumbai : नागपुरमध्ये सोमवारी (१७ मार्च) रात्री हिंसक घटना घडली. त्यामुळे महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे आहे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने समिती नेमली आहे.
नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही समिती आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये माजी प्रांताध्यक्ष गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण यांचा समावेश आहे.
Nagpur violence : पोलिस इंटेलिजन्स फेल, फडणवीसांनी राजीनामा द्यावा !
नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील हे समितीचे समन्वयक आहेत. काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल व शांतता प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
Tension in Mahal Nagpur : नारेबाजी झाली नसती तर दंगल पेटलीच नसती!
सोमवारी रात्री नागपूर शहरातील महाल परिसरात दंगळ उसळ्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आली. मंगळवार, बुधवार आणि आज गुरूवारीही संचारबंदी कायम आहे. महाल परिसर जी नागपुरातील महत्वाची बाजारपेठ आहे. ती पूर्णपणे बंद आहे. उर्वरीत शहरात मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. जमावाने पोलिसांवर केलेला हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरतेने घेतला आहे. आता काँग्रेसने समिती नेमल्यानंतर तणाव निवळण्यात मदत होईल, असे बोलले जात आहे.