Nagpur Shivsena UBT new executive committee : उद्धव सेनेत खांदेपालट; किशोर कुमेरियांवर शहराची धुरा, बंडखोरांना घरचा रस्ता!

kishor-kumeria-appointed-Mahanagar-chief : दोन जिल्हाध्यक्षांचा फॉर्म्युला मोडीत; नितीन तिवारींना डच्चू तर तरुणांना संधी

Nagpur नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शहरात मोठ्या संघटनात्मक फेरबदलांचे सत्र सुरू केले आहे. अनेक प्रस्थापितांना धक्का देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर शहराची संपूर्ण जबाबदारी आता किशोर कुमेरिया यांच्या खांद्यावर सोपवली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ‘दोन जिल्हाध्यक्ष’ ही पद्धत बंद करून कुमेरिया यांची ‘महानगरप्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या रचनेत बंडखोरांना कडक संदेश देण्यात आला असून संघटनेत नवीन रक्ताला प्राधान्य देण्यात आले आहे.

Devendra Fadnavis : कागदावरचे नव्हे, जमिनीवरचे करार!; फडणविसांचा विरोधकांना टोला

नव्याने जाहीर केलेल्या कार्यकारिणीत निष्ठावंतांना बक्षीस आणि शिस्तभंग करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत कुमेरिया यांच्या विरोधात बंडखोरी करणारे शहर प्रमुख नितीन तिवारी यांना नव्या कार्यकारिणीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. भौगोलिकदृष्ट्या शहराचे तीन भाग करून जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत:
संदीप रियाल (पटेल): मध्य आणि पश्चिम नागपूर.
हरिभाऊ बानाईत: पूर्व आणि उत्तर नागपूर.
विक्रम राठोड: दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम नागपूर.
उपशहर प्रमुख: महेंद्र कठाणे, शंकर थुल, राजू दळवी, पंकज अहिरराव, निखिल जाजुलवार आणि अभिषेक देशमुख या सहा जणांकडे उपशहर प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.

“युवकांना संधी द्या” हा उद्धव ठाकरे यांचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आता आक्रमक पावले उचलली जात आहेत. शहरातील सर्व ६ विधानसभा मतदारसंघांत लवकरच पक्षाची नवीन संपर्क कार्यालये उघडली जाणार आहेत. माध्यमांशी संवाद साधण्यासाठी एका महिन्याच्या आत ‘अधिकृत संपर्क प्रमुख’ जाहीर केला जाईल. रामकृष्ण लाडे यांनी नुकतेच शिवबंधन बांधले असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील इतर दिग्गजांनाही पक्षात सामावून घेण्याची मोहीम राबवली जाणार असल्याचे किशोर कुमेरिया यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

नागपूर महापालिकेत शिवसेनेचे केवळ दोनच उमेदवार (कुमेरिया आणि मंगला गवरे) निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकही जागा न सोडल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोष होता. विशेषतः ‘दक्षिण नागपूर’ मतदारसंघावर कुमेरिया आणि प्रमोद मानमोडे या दोघांनीही दावा केला होता, मात्र काँग्रेसच्या किरण पांडव यांनी घेतलेल्या मतांमुळे हा मतदारसंघ सुटला नव्हता. आता या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून काँग्रेससमोर आपली ताकद सिद्ध करण्याचे मोठे आव्हान कुमेरिया यांच्यासमोर असणार आहे.