Traffic police will run ‘footpath freedom’ campaign : रस्ता अडविणाऱ्यावर ऑन दि स्पॉट कारवाई; शुक्रवारपासून अंमलबजावणी
Nagpur नागपूर शहरात लोक फुटपाथवर गाड्या पार्क करतात. फुटपाथवर टपऱ्या टाकतात. फुटपाथवरच चौपाटी उभी होते. मग पादचाऱ्यांना वाहनांच्या मधून मार्ग काढत चालावे लागते. ही समस्या आजची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरकर या समस्येचा सामना करत आहेत. पण क्षणिक कारवाईवर पोलीस समाधानी होतात आणि नंतर परिस्थिती जैसे थे असते. आता पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. फुटपाथ फ्रिडम footpath freedom अभियान राबविले जाणार आहे.
आज, शुक्रवार दि. १७ जानेवारीपासून या सर्व प्रकारावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘फुटपाथ फ्रिडम’ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत अवैध ‘हॉकर्स’ व पदपथावरील ‘पार्क’ केलेल्या वाहनांवर कारवाईचा धडाका लावणार आहे. विशेष म्हणजे रस्ता अडविणाऱ्यांवर ऑन दि स्पॉट कारवाईची तयारीदेखील वाहतूक पोलिसांनी केली आहे.
Dr. Nilam Gorhe : अत्याचारी समुपदेशकाची उपसभापतींकडून गंभीर दखल
शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थासुद्धा बिघडली आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अपघातांमध्ये वाढ झाली होती. वाहतूक पोलिसांच्या भ्रष्ट धोरणांमुळेसुद्धा रस्त्यावरील फुटपाथवर दुकाने लावणाऱ्यांची संख्या वाढली होती. तसेच वाहतूक पोलिसांचा वचक संपल्यामुळे वाहनचालक footpath वर बिनधास्तपणे आपली वाहने ठेवतात.
फुटपाथवर अस्थायी दुकान लावणाऱ्यांकडून वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे पथक मोठी वसुली करीत होते. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ताळ्यावर येत नव्हती. ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपआयुक्त अर्चित चांडक यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘फुटपाथ फ्रिडम’ मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. आज शुक्रवारपासून वाहतूक पोलीस कारवाईचा धडाका सुरु करणार आहे.
Pramod Manmode : उद्धवसेनेच्या कार्यालयाकडे जिल्हाप्रमुखाचीच पाठ !
शहरातील सार्वजनिक रहदारीच्या मुख्य मार्गावरील फुटपाथवर अनेक वाहने लावलेली असतात. तर याच रस्त्यांवरील अस्थायी दुकानदार व्यवसाय करतात. यामुळे येथे येणारे ग्राहकही आपली वाहने त्याच पदपथावर किंवा रस्त्यावरच ठेवतात. त्यामुळे पदपथ पूर्णत: बंद होते. परिणामी पादचाऱ्यांना मुख्य मार्गाचा वापर करावा लागतो. अशावेळी मुख्य मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांमुळे या पादचाऱ्यांचा अपघात होण्याच्याही घटना घडल्या. अशा घटनांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. त्यामुळे ‘फुटपाथ फ्रिडम’मोहिम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.








