Breaking

Nagpur Vidhan Bhavan : विधानभवनाचा विस्तार ठरला; शासकीय मुद्रणालय देणार जागा

Government printing office land will be acquired for the expansion of Vidhan Bhavan : जागा हस्तांतर करण्याचे निर्देश; ना हरकत प्रमाणपत्र सोपवले

Nagpur भविष्यात लोकप्रतिनिधींच्या वाढत्या संख्येचा विचार करून नागपूर विधीमंडळाचा परिसर अपुरा पडणार आहे. त्यादृष्टीने विधानभवनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शासकीय मुद्रणालयाची जागा घेण्याचेही ठरले होते. पण,अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गोदामाचा अडसर निर्माण झाला होता. आता ही अडचण दूर झाली असून विस्तारावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जागांच्या हस्तांतरासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले आहेत. त्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र बुधवारी सोपवण्यात आले आहे. शासकीय मुद्रणालयाच्या १६,१८२ चौरस मीटर जागेपैकी ९,६६० चौरस मीटर जागा विधानमंडळ सचिवालयाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. उद्योग खात्याने महसूल विभागाला त्यासंदर्भातील नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.

Maharashtra Legislative Council Monsoon Session : दिव्यांग आय़ुक्त होणार निलंबित, आमदार संदीप जोशींनी वेधले होते लक्ष !

महसूल विभाग ती विधिमंडळाच्या सचिवालयाला हस्तांतरित करेल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांना यासंबंधीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव अश्विनी यमगर यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही केले आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने धान उत्पादकांना मिळणार गोसिखुर्दचे पाणी !

शासकीय मुद्रणालयाच्या १६१८२ चौरस मीटर जमिनीपैकी ९६६० चौरस मीटर जमीन विधानमंडळ सचिवालयाला देण्याचा आदेश दिला होता. बदल्यात पुरवठा विभागाच्या १७६३० चौरस मीटर जमिनीपैकी तितकीच जागा शासकीय मुद्रणालयाला देण्यात यावी, असे निर्देश होते. यासाठी महसूल विभागाने एनओसी दिली होती. मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ती जागा देण्यास नकार दिला. कारण, त्याठिकाणी गोदाम आहे आणि ती जागा अत्यावश्यक असल्याचा त्यांचा दावा होता. पण आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.