Celebrities in Mumbai, Sarpanch in Villeges are unsafe : गुंतवणुकीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी
Nagpur काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईत सेलिब्रिटी आणि गावांमध्ये सरपंच सुरक्षित नाहीत, या शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले. सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना स्पीड पोस्टने आली कायदेशीर नोटीस
पटोले शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत. मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री भ्रष्टाचारी असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
District Court of Gondia : कुऱ्हाडीने मारहाण, बाप-लेकाला 5 वर्षे सश्रम कारावास !
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू. या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचे आहे. मराठा-ओबीसी वाद भाजपा युती सरकारनेच निर्माण केला आहे. त्यातून जनतेचे मूळ प्रश्न बाजूलाच पडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
महायुतीने विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची मते हवी होती म्हणून सर्व बहिणींना योजनेचा लाभ दिला. आता महायुती सरकारला योजनेतील त्रुटी दिसत आहेत. बोगस लाभार्थी बहिणींकडून पैसे परत घेण्याची धमकी मंत्री देत आहेत. यातून भाजपा युतीचा खरा चेहरा उघडा पडला आहे. घोषणा केल्याप्रमाणे लाडक्या बहिणीला सरसकट २१०० रुपये कधी देणार, असा सवाल पटोले यांनी केला.