Breaking

Nana Patole : महाकुंभातील दुर्घटनेवर संघाचे मौन का?

Why RSS is silent on MahaKumbh tragedy? : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डिवचले

Nagpur प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. महाकुंभातील दुर्घटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मौन का बाळगले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागपुरात ते माध्यमांशी संवाद साधत होते.

महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर केंद्रातील मोदी सरकारवर तसेच उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर टीका होत आहे. काँग्रेस व इतर विरोधी पक्ष सातत्याने घटनेचा जाब विचारत आहेत. केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी देखील भाजपला या घटनेवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. १ फेब्रुवारीपासून केंद्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. आज, शनिवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशात महाकुंभमधील घटनेवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधक प्रयत्न करू शकतात.

CM Devendra Fadnavis : नागपुरात कधी होणार पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स?

दरम्यान, नाना पटोले यांनी संघावर टीका केली आहे. संघाकडून आमचा राजकारणाशी संबंध नाही, असा दावा केला जातो. पण भाजप राजकीय पक्ष असताना त्यांना मदत करण्यासाठी मात्र हे नेहमी समोर येतात. महाकुंभात भाजपने जो इव्हेंट उभा केला. त्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला. या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार, संघाने त्यावर खुलासा करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. वास्तविकता पुढे येऊ नये म्हणून मीडियाला तिथे जाण्यास बंदी केली. मृतदेह वाहून देण्यात आले. संतांचे टेंट जळत आहे, काही तरी गडबड तिथे सुरू आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसने निवडणूक आयोगाचा प्रणालीवर भूमिका मांडली. तीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज ठाकरे हे पारदर्शकता सांगायचे; पण भूमिका ठेवली नव्हती. आयोगाने अद्याप वाढलेल्या ७६ लाख मतांची माहिती दिली नाही. दिवसाढवळ्या भाजपप्रणीत केंद्रीय नेतृत्वाने लोकशाहीचा गळा चिरला आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

Nagpur Education Board : हयात नसलेल्या शिक्षकाला बोर्डाने दिले आदेश

राज्य मंत्रीमंडळातील ६५ टक्के मंत्री गुन्हेगार आहेत. एक धनंजय मुंडे नाही तर ६५ टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील. मुख्यमंत्री दिल्लीत प्रचारासाठी जात आहेत. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले जात आहे, अशी टीका पटोले यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संदर्भात निर्णय लवकरच होईल. मी यासंदर्भात दिल्लीला जाऊन आलो व लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत माझी चर्चा झाली आहे. यात पदाधिकाऱ्यांचा दोष नसेल तर त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.