Nanded Politics : नांदेडमध्ये अशोकराव – प्रतापराव संघर्ष शिगेला !

 

Ashok Chavan Prataprao Chikhlikar conflict reaches its peak in Nanded : शाब्दिक चकमक ‘दंडुक-प्रहार’पर्यन्त जाऊन पोहोचली

Nanded : महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टी व घटक पक्षांचे एकत्रित महायुती सरकार आले आहे. महायुतीचा राज्यकारभार गुण्या-गोविंदाने चालू असला तरी मात्र मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत व मतदारसंघांत महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच चालू आहे. आपापसातील मतभेद-मनभेद उघडपणे जनसामान्यांसमोर येताना दिसून येत आहेत.

सद्यस्थितीचा विचार करता आगामी काळात जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर पालिका – महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका होणार आहेत. परंतु महायुतीतील नेत्यांमध्ये मात्र सर्व काही आल-बेल दिसून येते आहे. नांदेड जिल्ह्यात “अशोकराव विरुद्ध प्रतापराव” हा सामना काही थांबता थांबेनासा झालाय.

Chandrashekhar Bawankule : सामनातील अग्रलेख उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठीच !

अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर दोघेही काही काळ सम पक्षात होते. परन्तु आता महायुतीत असूनही एकमेकांबद्दल शाब्दिक चकमक सुरूच होती. आता ही शाब्दिक चकमक ‘दंडुक-प्रहार’पर्यन्त जाऊन पोहोचली आहे. यात अशोकरावांसाठी ‘अमर’साथ कायम असून आता संयमी ‘एकनाथ’ मात्र सडेतोड उत्तरास समर्थ ठरत आहेत. तरीही संथगतीने कार्यरत असणारे ‘जिल्हाध्यक्ष’ संतुष्टपणे अद्यापही कसलेही, कुठेही ठामपणे उत्तर देण्यास असमर्थ दिसून येत आहेत.

Harshwardhan Sapkal : दलित, मुस्लीम किंवा महिला सरसंघचालक का नाही?

लोहा-कंधार मतदारसंघात डझनभर नेते आणि पायलीभर कार्यकर्ते दोन्हीही पक्षांकडे आहेत. निवडणुकीत महायुतीला समर्थपणे साथ मिळेल की नाही ही मोठी शंकाच आहे. या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) हा शांतीदूत भूमिकेत आहे. इतरत्र विरोधीपक्षांना अस्तित्वात असल्याची जाण करून द्यावी लागेल, अशी वर्तमान स्थिती असली तरीही सक्षमपणे या मतदारसंघात अशोकरावांना साथ देणारी सक्षम फळी आहे का? प्रतापरावांची कार्यशैली ‘सरस’ ठरू शकेल का? चालू असलेले दंडुक-प्रहार राजकारण थांबविण्यासाठी महायुतीतील कुणी नेते लक्ष घालतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.