Narendra Modi : महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा मिळते

Balasaheb Thackeray birth centenary begins PM Narendra Modi pays tribute in Marathi :बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीची सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून आदरांजली

Mumbai: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. आज 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात होत आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावर विशेष पोस्ट शेअर करत बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा, विचारांचा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय जीवनावर पडलेल्या प्रभावाचा गौरव केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते.

Amravati Mayor Battle : आरक्षण सोडतीनंतर भाजप-काँग्रेसमध्ये चुरस, अमरावती महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच

राजकारणासोबतच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य प्रकर्षाने दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह मुंबईतील रीगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात जन्मलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची यंदा जन्मशताब्दी साजरी होत असून हा दिवस तमाम शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Vijay Wadettiwar : नागपुरात शिवानी दाणींसाठीच आरक्षण काढले, वडेट्टीवारांचा आरोप

या पार्श्वभूमीवर मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही उपस्थितांना संबोधित करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.