Prime Minister Narendra Modi praised the work of the Rashtriya Swayamsevak Sangh including Madhav Netralaya : माधव नेत्रालयाने लोकांच्या जिवनात प्रकाश आणला
Nagpur : नागपूर शहरात हिंगणा मार्गावरील वासुदेव नगर मेट्रो स्टेशनच्या जवळील माधव नेत्रालयाच्या प्रशस्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. ‘गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा’, असे म्हणत पंतप्रधानांनी भाषणाला सुरूवात केली. मोदींनी मराठीतून शुभेच्छा देताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
व्यासपीठावार सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी गोविंद गीरी महाराज, अवधेशानंत गिरी महाराज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माधव नेत्रालयाचे महासचिव डॉ. अविनाश चंद्र अग्नीहोत्री होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, राष्ट्रसेवाच्या या पावन अनुष्ठानात आज (३० मार्च) मला येथे येण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. आज चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस विशेष आहे. आजपासून नवरात्रीचे पवित्र पर्व सुरू होत आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यांत आज गुढीपाडवा साजरा केला जात आहे. भगवान झुलेलाल आणि गुरू अंगददेवाचा आज अवतरण दिवस आहे. प्रेरणापुंज परमपूज्य डॉ. हेडगेवार यांची जयंती आज आहे. संघाच्या गौरवशाली यात्रेचे १०० वर्षही आजच पूर्ण होत आहेत. या निमित्त स्मृतीमंदिरात जाऊन डॉ. हेडगेवार गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करण्याचे सौभाग्य मला मिळाले. याच कालखंडात आपण संविधानाचा ७५ वर्षाचा उत्सव साजरा केला. पुढच्या महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही आहे. आज दिक्षाभूमीवर बाबासाहेबांना नमन केले. त्यांचा आशीर्वाद घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
PM Modi Nagpur Visit : दीक्षाभूमी भेटीतून पंतप्रधानांनी घडवले समतेचे दर्शन
देशवासीयांना नवरात्री आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना नागपुरात आज संघ सेवेच्या या पवित्र यज्ञात पुण्य संकल्पाच्या विस्ताराचे साक्षीदार होता आले, याचा मनस्वी आनंद आहे. माधव नेत्रालय म्हणजे अध्यात्म, ज्ञान आणि गौरव गुरुतेचे हे अदभूत विद्यालय आहे. मानवता सेवा मंदिर म्हणजे कणाकणांत देवालय आहे. अनेक दशकांपासून डॉ. हेडगेवार गुरूजींच्या आदर्शावर माधव नेत्रालय संस्थान लाखो लोकांची सेवा करत आहे. या संस्थानाने लोकांच्या जिवनान प्रकाश आणला असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
PM Modi Nagpur Visit : पंतप्रधान मोदी संघभूमित, स्मृति मंदिराला भेट!
आज माधव नेत्रालयाच्या नव्या परिसराचे भूमिपूजन झाले. आता संघाच्या स्वयंसेवकांना अधिक गती मिळणार आहे. हजारो लोकांच्या जिवनात प्रकाश येणार. त्यांच्या जिवनातील अंधकार दूर होणार. यासाठी माधव नेत्रालयाच्या सर्व सहकाऱ्यांचे मी कौतुक करतो. लाल किल्ल्यावरून देशहितासाठी सर्वांचे प्रयत्न असले पाहिजे, असे मी बोललो होतो. आज आरोग्याच्या क्षेत्रात देश काम करत आहे. माधव नेत्रालय त्या प्रयत्नांना वाढवत आहे. देशातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्या, याला आम्ही प्राधान्य देतो. देशातील गरीबातल्या गरीबाला चांगल्यात चांगला उपचार मिळाला पाहिजे, हीच सरकारची निती असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.