Narendra Modi’s Nagpur Tour : पंतप्रधानांच्या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या !

Narendra Modi is the second Prime Minister to visit the Smriti Mandir after the late Atal Bihari Vajpayee : अॅक्वा लाईनवर दर ८ मिनिटांनी उपलब्ध असणार मेट्रो

Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (३० मार्च) नागपुरात दाखल होणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाथी ते पाच तास शहरात असणार आहेत. यावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागपूर मेट्रोने अॅक्वा लाईनवर (प्रजापती नगर ते लोकमान्य नगर) दर ७ मिनिटांनी सेवा उपलब्ध करून दिली आहे. सकाळी ८ ते दुपारी २ या वेळात ही विशेष सेवा असणार आहे.

माधव नेत्रालय हे वासुदेव नगर मेट्रो स्टेशनला लागूनच आहे. शहराच्या प्रत्येक भागातील लोकांना तेथे पोहोचणे सोयीचे व्हावे म्हणून मेट्रोने हा निर्णय घेतला आहे. तशी मागणीही नागरिकांनी केली होती, असे मेट्रो व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. माधव नेत्रालय या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी नागरिकांनी मेट्रोचा वापर करावा. जेणेकरून वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होईल, असेही कळवण्यात आले आहे.

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या क्षयरोगमुक्त भारत संकल्पनेला जिल्हा परिषदेचे बळ

मोदी ठरतील दुसरे पंतप्रधान..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संघाच्या शताब्दी वर्षाला नरेंद्र मोदी हेडगेवार स्मृती मंदिरात जाणार आहेत. संघ वर्षभरात जितके काही उत्सव साजरे करतात. त्यांपैकी गुढीपाडवा हा त्यांचा एक महत्वाचा उत्सव मानला जातो.

PM Narendra Modi : पिक कर्ज व्याज सवलत योजना आता ५ लाखापर्यंत!

मोदी स्वतः स्वयंसेवक – प्रचारक आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी ते स्मृती मंदिरात गेलेही असतील. पण पंतप्रधान झाल्यानंतर उद्या ते प्रथमतः स्मृती मंदिरात जाणार आहेत. यापूर्वी सन २०००मध्ये पंतप्रधान पदावर असताना स्व. अटलबिहारी वाजपेयी रेशीमबागेत गेले होते. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिरात जाणार आहेत. असं करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत.