व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Nashik crime news : खंडणीप्रकरणी चौघांना सिनेस्टाईल अटक, २०० व्हिडीओंमुळे संशयाचा धुरळा...

Nashik crime news : खंडणीप्रकरणी चौघांना सिनेस्टाईल अटक, २०० व्हिडीओंमुळे संशयाचा धुरळा !

nashik-crime-news-extortion-case-12-lakh-demand-tab-theft-200-videos-arrest : नाशिकमध्ये खंडणी आणि अश्लील व्हिडीओंचे नवे प्रकरण उघड

Nashik : नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच शहरात आणखी एक धक्कादायक गुन्हा समोर आला असून खंडणी आणि खासगी व्हिडीओंवरून ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. सातपूर परिसरातील एका ज्येष्ठ व्यावसायिकाला लक्ष्य करत त्याच्या चोरीला गेलेल्या टॅबमधील खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी सातपूर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचत चार संशयितांना रंगेहाथ अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यावसायिकाच्या कार्यालयातून काही दिवसांपूर्वी टॅब चोरीला गेला होता. या टॅबमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खासगी व्हिडीओ साठवलेले होते. संशयितांनी हेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडे १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. वारंवार धमक्या दिल्यानंतर अखेर पैशांच्या व्यवहारासाठी ठराविक ठिकाणी बोलावण्यात आले.

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत नगरसेवकांचे बंडाचे रणशिंग! अंतर्गत कलहाचा अदृश्य सूत्रधार कोण?

या माहितीची खबर पोलिसांना मिळताच सातपूर पोलीस आणि क्राईम ब्रँच युनिट २ ने संयुक्त कारवाई करत सापळा रचला. आरोपींनी पोलिसांची चाहूल लागताच पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करत त्यांना पकडले. चित्रपटाला शोभेल अशा या कारवाईत आरोपींना १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर येत असून चोरीला गेलेल्या टॅबमध्ये तब्बल २०० हून अधिक व्हिडीओ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या व्हिडीओंच्या स्वरूपाबाबत आणि त्यांचा वापर करून आणखी कोणाला ब्लॅकमेल करण्यात आले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

दरम्यान, तक्रारदार असलेल्या व्यावसायिकाबाबतही पोलिसांना काही शंका निर्माण झाल्या असून त्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. टॅबमधील व्हिडीओंचा स्वरूप, त्यामागील संभाव्य नेटवर्क आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तांत्रिक पुरावे गोळा करून संपूर्ण प्रकरणाचा तपास दोन्ही बाजूंनी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Ias transfer : राज्यात प्रशासनिक भूकंप; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या

अशोक खरात प्रकरणामुळे आधीच नाशिक राज्यभर चर्चेत असताना या नव्या प्रकारामुळे शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप अधिक गंभीर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि खासगी माहितीचा गैरवापर यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या तपासातून आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!