
shivsena-shinde-group-filing-nomination-for-mayor-in-nashik-ignoring-bjp : १२२ पैकी ७२ जागा जिंकूनही भाजपची कोंडी; विलास शिंदेंसह ४ नगरसेवकांचे अनपेक्षित पाऊल
Nashik नाशिक महानगरपालिकेच्या राजकारणात सोमवारी एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले. महापालिका निवडणुकीत ७२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देत, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) चार नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत. भाजपला डावलून उचललेल्या या पावलामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, युतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.
नाशिक महापालिकेत एकूण १२२ जागांपैकी भाजपने ७२ जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी केली होती. मात्र, सत्तेत वाटा मिळवण्यावरून शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये सुरुवातीपासूनच अस्वस्थता होती. भाजपने मित्रपक्षांना बिनशर्त पाठिंब्याचे आवाहन केले होते, परंतु त्या बदल्यात महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समिती सभापती यांसारख्या महत्त्वाच्या पदांबाबत कोणतीही ठोस हमी दिली नव्हती. याच कारणास्तव नाराज झालेल्या शिंदे गटाच्या नगरसेवकांनी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
Pune Municipal Corporation Mayor Election : अनुभवी नगरसेविका मंजुषा नागपुरे पुण्याच्या महापौर
सोमवारी ज्येष्ठ नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह रंजना बोराडे, सुवर्णा मटाले आणि राहुल दिवे या चार नगरसेवकांनी प्रत्येकी महापौर व उपमहापौर पदासाठी आपले नामांकन अर्ज दाखल केले. भाजपच्या स्पष्ट बहुमताला आव्हान देण्याच्या या निर्णयामुळे युतीमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नसली, तरी या बंडखोरीमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
Ajit Pawar Plane crash : विमान अपघात, नेत्यांचा हवाई प्रवास आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न !
दुसरीकडे, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनीही आपली गटनोंदणी पूर्ण केली असून ते आक्रमक पवित्र्यात आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिकमधील मूलभूत प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नव्या महापौरांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, महायुतीमधील या नव्या पेचप्रसंगामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.








