National Education Policy : शैक्षणिक धोरण उपयुक्त, मात्र अंमलबजावणीत अडचणी

Educational policy is useful, but implementation is difficult : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुद्यावर विचारमंथन

Akola देशाची भावी पिढी घडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० उपयुक्त असून शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा सर्वसमावेशक आहे. मात्र, या मसुद्यात काही बदल करण्याची आवश्यकता जाणवते. या धोरणाच्या अंमलबजावणीत मोठ्या अडचणींचा डोंगर असल्याचा सूर शहरातील परिसंवादात उमटला.

सामर्थ्य फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ अंतर्गत शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुद्यावर आधारित परिसंवादाचे आयोजन श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने वसंत सभागृहात करण्यात आले.

परिसंवादाचे अध्यक्षस्थान माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय खडक्कार, मुख्याध्यापक संघटनेचे महानगराध्यक्ष माधव मुंशी, प्रशिक्षक गोपाल सुरे, तसेच संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव आणि समन्वयक डॉ. संजय शेंडे उपस्थित होते.

Laxman Hake : ओबीसींच्या विरोधातून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न, प्रा. हाके यांचा आरोप

अतिथींचे स्वागत प्रवीण पळसपगार, डॉ. गजानन वाघोडे, रवींद्र बुलनकर, अॅड. दीपक दामोदरे, डॉ. अशोक सोनोने, प्रमोद रत्नपारखी, राजकुमार उखळकर आणि दीपक जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मनोज आगरकर आणि डॉ. श्रीकांत उखळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. स्मिता मळतकर यांनी मानले.

परिसंवादात मसुद्यातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. डॉ. संजय खडक्कार यांनी धोरणाच्या इतिहासावर प्रकाश टाकताना सांगितले की, भारतीय शिक्षण प्रणाली जागतिक स्तरावर ज्ञान महासत्ता होण्यासाठी या धोरणाची रचना करण्यात आली आहे. बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलता, सृजनशीलता आणि कौशल्यविकासावर भर दिला आहे, असे गोपाल सुरे म्हणाले.

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य देण्याची तरतूद चांगली असली तरी प्रत्यक्षात ती स्वप्नवत आहे. या माध्यमातून अनुदानाचा भार कमी करण्याचा प्रयत्न असून शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कार्यभारावर लक्ष द्यायला हवे.

डॉ. रामेश्वर भिसे यांनी नमूद केले की, विषय निवडीचे स्वातंत्र्य दिल्यामुळे उच्च शिक्षणात गोंधळ निर्माण झाला आहे. शालेय स्तरावर हे धोरण राबवताना अशा समस्या टाळाव्यात. शिक्षणात राजकीय हस्तक्षेप टाळणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गजानन नारे यांनी सांगितले.

Ravindra Chavhan : प्रत्येक जाती-धर्मांमध्ये भाजपचा प्रचार करा, प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

प्रास्ताविकात ‘सामर्थ्य’चे अध्यक्ष प्रबोध देशपांडे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत परिसंवादामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. संजय शेंडे यांनी सांगितले की, प्रस्तावित मसुद्यात अर्थशास्त्रासह अनेक नवीन विषयांचा समावेश आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. अरविंद मोहरे यांनी परिसंवादातून आलेल्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करून धोरण प्रभावीपणे राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.