Navi Mumbai Airport : मविआ सरकारमुळे देशाचे हजारो कोटींचे नुकसान

Prime Minister Narendra Modi’s attack on the Thackeray government : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाकरे सरकारवर घणाघात

Navi Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या मविआ सरकारवर तीव्र शब्दात हल्ला चढवला. “मविआ सरकारमुळे देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले. मुंबईकरांना विकासासाठी चार-पाच वर्षे थांबावे लागले. हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही,” असे ते म्हणाले.

मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून आज बुधवारी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे, तसेच मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

TET Exam : टीईटी अनिवार्यतेविरोधात शिक्षक संघाचा एल्गार!

पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर दहशतवादाच्या मुद्यावरून जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या कमजोरीमुळे देशात दहशतवादाला बळ मिळाले. मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानवर प्रत्युत्तर द्यायला तयार होते, पण काँग्रेसने विदेशी दबावाखाली तो निर्णय थांबवला. देशाला पुन्हा पुन्हा जीव गमवावे लागले, असे मोदी म्हणाले.

त्यांनी म्हटले, आजचा भारत दमदार आहे. जो घरात घुसून मारतो. आजचा भारत जगातल्या कुठल्याही दबावाखाली येत नाही. मुंबईतील विकास प्रकल्पांबाबत बोलताना मोदी म्हणाले, मी जेव्हा मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं, तेव्हा काम गतीत होतं. पण मविआ सरकार आल्यानंतर काम थांबवलं गेलं. त्यामुळे देशाचे आणि मुंबईकरांचे नुकसान झाले.

त्यांनी सांगितले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. प्रत्येक मिनिटाचं महत्त्व इथे असतं. पण काही लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे शहराला चार-पाच वर्षे मागे जावं लागलं. २०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज ती संख्या १६० वर पोहोचली आहे. माझं स्वप्न होतं की, हवाई चप्पल घालणारा सामान्य माणूसही विमान प्रवास करेल आणि आज ते वास्तवात आलं आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, भारताकडून १,००० नवीन विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे वैमानिक, केबिन क्रू, ग्राउंड स्टाफ आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Hunger strike : विदर्भ महसूल संघटनेचं उपोषण २३ दिवसांपासून !

आपल्या भाषणाचा शेवट करताना मोदी म्हणाले, आम्ही अशा वातावरणात वाढलो आहोत जिथे राष्ट्रनीती हाच राजनितीचा आधार आहे. देशहितासाठी काम करणं हीच आमची प्राथमिकता आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास हा आपल्या प्रगतीचा केंद्रबिंदू राहील.”