Navneet Rana : ‘हिंदूंनीही तीन-चार मुले जन्माला घालावीत’

Ex-MP hits out at remark on four wives and 19 children : चार बायका आणि १९ मुलांच्या वक्तव्यावर नवनीत राणांचा हल्लाबोल;

Amravati एका मौलानाने आपल्याला चार बायका आणि १९ मुले असल्याचे जाहीरपणे सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित मौलानाने आपल्याला ३० ते ३५ मुले हवी होती, मात्र ते ‘कोरम’ पूर्ण करू शकले नाही, याची लाज वाटते, असे विधान केल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला.

यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, “जर ते खुलेपणे सांगत असतील की त्यांना चार बायका आणि १९ मुले आहेत, तर आपल्या हिंदू समाजानेही किमान तीन-तीन, चार-चार मुले जन्माला घातली पाहिजेत.” मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला चार बायका आणि १९ मुले असल्याचे सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “मी सगळ्या हिंदू लोकांना आवाहन करते की, जर ते मोठ्या संख्येने मुले जन्माला घालत असतील, तर आपण एका मुलावर का समाधान मानायचे? त्यांचा विचार हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. त्यामुळे हिंदूंनीही तीन ते चार मुले जन्माला घालावीत, यामध्ये कोणतेही दुमत नाही.”

Uddhav Balasaheb Thackeray : पुण्यात ठाकरे गटाला खिंडार; बडे नेते भाजपच्या गळाला

दरम्यान, मुर्शिदाबाद येथील मशिदीच्या मुद्द्यावरूनही नवनीत राणा यांनी यापूर्वी वादग्रस्त विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, काँग्रेसने आजवर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आमदारांनीही तेच करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच, “जर बाबराच्या नावाने मशीद बांधली गेली, तर कारसेवक तेथे जातील, कारसेवा करतील आणि ती तोडण्याचे काम करतील,” असे विधानही त्यांनी केले होते.

Sanjay Raut : मुनगंटीवार हे भाजपाचे ‘शंभर नंबरी सोनं’

मजबूरी म्हणून ठाकरे बंधूंची युती?
दरम्यान, पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होण्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, “शरद पवार हे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार हे त्यांच्याच परिवारातील आहेत. अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की भाजपसोबत जाण्याचा सल्ला शरद पवार यांनीच दिला होता. त्यामुळे दोन पवार एकत्र येत असतील, तर ते चांगलेच आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “दोन ठाकरे एकत्र येत आहेत, ती त्यांची मजबूरी आहे. म्हणूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत,” असा दावा नवनीत राणा यांनी केला.